Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या,भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी

टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे(Niranjan Davkhare Demand To Thakre Government) यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे केली आहे.

  • By साधना
Updated On: Jun 08, 2021 | 03:17 PM
राज्य सरकारच्या तिजोरीतून वाचलेले सात हजार कोटी गरीबांना द्या,भाजपची ठाकरे सरकारकडे मागणी
Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : देशातील १८ वर्षांवरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची(Free Vaccination) जबाबदारी घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. एकरकमी धनादेश देऊन लसखरेदी करण्याची तयारी दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने  वाचलेल्या सात हजार कोटींच्या निधीतून आता गोरगरीब जनता, शेतकरी, बारा बलुतेदार, रिक्षा-टॅक्सीचालक, मजूर, केश कर्तनालयांचे चालक तसेच टाळेबंदीच्या काळात रोजगारास मुकलेल्या सर्वांकरिता तातडीने पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे(Niranjan Davkhare Demand To Thakre Government) यांनी मंगळवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ठाकरे सरकारकडे केली आहे.

[read_also content=”Vastu Tips – घरामध्ये ‘या’ दिशेला लावा मनी प्लांट नाहीतर होईल आर्थिक नुकसान https://www.navarashtra.com/latest-news/according-to-vastushastra-money-plant-should-be-kept-at-right-direction-nrsr-139561.html”]

देशातील लसीकरण मोहिमेची सूत्रे केंद्र सरकारने हाती घेतल्याने राज्यातील लसीकरणाचा खेळखंडोबा संपणार आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतः उचलल्याने देशातील जनतेस मोठा दिलासा मिळणार आहे, असे स्पष्ट करून आमदार निरंजन डावखरे यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत. आता महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेस आर्थिक संकटात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने सात हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

केंद्र सरकारने राज्यांना लस खरेदीची मुभा दिल्यानंतर महाराष्ट्राकरिता एकरकमी धनादेश देऊन १२ कोटी लस मात्रा विकत घेण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आता लस पुरवठ्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने उचलल्याने या धनादेशाचा वाचलेला सुमारे सात हजार कोटींचा निधी राज्य सरकारने तातडीने गोरगरीब जनतेकरिता तातडीने वितरित करावा व गेल्या दीड वर्षांपासून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या जनतेस दिलासा द्यावा, असे  डावखरे म्हणाले.

ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजची दमडीदेखील अजूनही कोणाच्याच खात्यात जमा झालेली नसल्याने जनतेमध्ये तीव्र संताप पसरला असून त्याचा उद्रेक होण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली मोफत लसीकरण मोहीम राबविण्यासाठी राज्य सरकारने लसीकरणाचा नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर करून केंद्राच्या मोहिमेस सहकार्य करावे व राजकारण न करता जनतेच्या जीवित रक्षणास प्राधान्य द्यावे, असेही डावखरे म्हणाले.

Web Title: Niranjan davkhare demands package for lockdown affected people nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2021 | 03:15 PM

Topics:  

  • maharashtra
  • Niranjan Davkhare
  • Package

संबंधित बातम्या

खऱ्या ओबीसींनाच पक्षांनी उमेदवारी द्यावी, अन्यथा…; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा
1

खऱ्या ओबीसींनाच पक्षांनी उमेदवारी द्यावी, अन्यथा…; ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार
2

Aapla Dawakhana ठरला रुग्णांचा आधार, महिन्याला ३ लाख ८९ हजार रुग्णांनी घेतले उपचार

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती
3

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची मकर संक्रांत गोड! खात्यात जमा होणार ४५०० रुपये; ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ होण्याची शक्यता 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.