Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pahalgam Terror Attack: ओळख विचारली, धर्म विचारला… पहलगाम हल्ल्यात TRFचा हमासचा पॅटर्न

दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते. त्याने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. दहशतवाद्यांनी सर्वांना  घटनेच्या ठिकाणी एकत्र केले, त्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 23, 2025 | 12:23 PM
Pahalgam Terror Attack: ओळख विचारली, धर्म विचारला… पहलगाम हल्ल्यात TRFचा हमासचा पॅटर्न
Follow Us
Close
Follow Us:

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 17 हून अधिक जण जखमी झाले आहेत. हे हल्ले बैसरण व्हॅली याठिकाणी झाले. बैसरणच्या हिरव्यागार टेकडीवर, पर्यटक पर्यटनाचा आनंद घेत असताना तिथे अचानक दहशतवाद्यांकडून गोळ्यांचा जोरदार वर्षाव झाला. हातात मोठ्या बंदुका घेतलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर जवळून गोळीबार केला. या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. ज्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी ते आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी गेले होते. या घटनेमुळे देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.​

ज्याला “मिनी-स्वित्झर्लंड” म्हणून ओळख असलेल्या पहलगामच्या बैसरण खोऱे आज रक्ताने आणि अश्रूंनी माखून गेले आहे.  मंगळवारी (२२ एप्रिल) एका दहशतवाद्यांच्या गटाने केलेल्या हल्ल्यामुळे  खोऱ्यात  दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी पर्यंटकांचे धर्म विचारून, त्यांची ओळख विचारून त्यांच्यावर गोळीबार केला. यात २६  निष्पापांचे जीव घेतले.

 दुसरीकडे या हल्ल्याकडे पाहिले असता,  TRF ने  या हल्ल्यात  इस्त्रायल-हमास  हल्ल्याचा पॅटर्न दिसून येत आहे.  ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला होता.  इस्रायलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी अशाच प्रकारे १२०० लोकांची हत्या केली होती.  यामध्ये रीमजवळील नोव्हा संगीत महोत्सवात सहभागी झालेले २५० इस्रायली लोकांचा समावेश होता. याशिवाय, हमासच्या दहशतवाद्यांनी २५० इस्रायलींनाही ओलीस ठेवले होते.

“मुस्लीम आहेस? कलमा वाच”, कानपूरच्या शुभमला दहशतवाद्यांनी झाडली गोळी, २ महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न

या दोन्ही घटनांमध्ये, द्वेषाने भरलेल्या काही दहशतवाद्यांनी पर्यटनाचा आनंद घेत असलेल्या नि:शस्त्र आणि निष्पाप नागरिकांना लक्ष्य केले. पहलगाममध्ये, पाकिस्तान पुरस्कृत टीआरएफ दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांना अझान म्हणण्यास सांगितले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात, हमासच्या दहशतवाद्यांनी निवडकपणे ज्यू नागरिकांची, विशेषतः गाझा सीमेजवळील समुदायांची हत्या केली. दोन्ही हल्ल्यांमध्ये, धर्माच्या आधारे लोकांना निवडण्याचे दहशतवाद्यांचे धोरण स्पष्टपणे दिसून आले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी त्यांच्या शरीरावर कॅमेरे लावले होते. त्याने संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. दहशतवाद्यांनी सर्वांना  घटनेच्या ठिकाणी एकत्र केले, त्यांना ओळखले आणि नंतर त्यांच्यावर हल्ला केला.

इस्रायलमध्ये हल्ला करण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांनी रॉकेट बॅरेज, पॅराग्लायडर आणि वाहनांचा वापर करून इस्रायलमध्ये घुसखोरी केली होती. त्यांची संख्या शेकडोंमध्ये होती. पहलगाममध्ये लष्कराचा गणवेश परिधान केलेल्या चार ते सहा दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे मानले जाते. अहवालानुसार, दहशतवाद्यांनी या ठिकाणाची आधीच रेकी केली होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या पर्यटन हंगाम आहे. पहलगामच्या बैसरण खोऱ्यात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी आहे. येथे मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. हे ठिकाण तुलनेने शांत मानले जाते, त्यामुळे येथे सुरक्षा तैनात नव्हती. याचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पहलगामवर हल्ला केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानची प्रतिक्रिया; संरक्षण मंत्री म्हणतात, ‘आमचा काहीही संबंध नाही’

 

Web Title: Pahalgam terror attack asked about identity asked about religion trfs hamas pattern in pahalgam attack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 12:02 PM

Topics:  

  • kashmir news
  • pahalgam attack

संबंधित बातम्या

काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’चा प्रभाव; अनेक भागांत बर्फवृष्टी व पावसाचा इशारा, गुलमर्ग-पहलगाममधील तापमान शून्याखाली
1

काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’चा प्रभाव; अनेक भागांत बर्फवृष्टी व पावसाचा इशारा, गुलमर्ग-पहलगाममधील तापमान शून्याखाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.