Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आसाममधील दहशत अखेर संपला; केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अतिरेकी संघटना ULFA मध्ये शांतता करार

  • By युवराज भगत
Updated On: Dec 29, 2023 | 08:21 PM
End terrorism in Assam; A peace accord between the Centre, State Governments and militant outfit ULFA

End terrorism in Assam; A peace accord between the Centre, State Governments and militant outfit ULFA

Follow Us
Close
Follow Us:

End Terrorism in Assam : भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (ULFA) यांच्यात त्रिपक्षीय शांतता करार करण्यात आला आहे. ४० वर्षांत पहिल्यांदाच सशस्त्र अतिरेकी संघटन उल्फाचा भारत आणि आसाम सरकारशी पहिल्यांदाच शांतता करार झाला आहे. ज्यावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर संबंधितांनी स्वाक्षरी केली. ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले जाते. उल्फाकडून गेली अनेक वर्ष सशस्त्र उठाव केला जात होता. त्यामुळे सुरक्षा दल आणि उल्फा बंडखोरांमध्ये अनेकदा हिंसक संघर्ष पेटलेला पाहायला मिळायचा.

#WATCH | On United Liberation Front of Assam (ULFA)’s signing a tripartite Memorandum of Settlement with the Centre and the Assam government, Union Home Minister Amit Shah says, "It is a matter of joy for me that today is a bright day for the future of Assam. For a long time,… pic.twitter.com/JtgBDjjL5n

— ANI (@ANI) December 29, 2023

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत सदर शांतता करार करण्यात आला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा, गृह सचिव अजय भल्ला, आसामचे पोलिस महासंचालक जीपी सिंह यांच्यासह उल्फा समूहाचे सदस्य उपस्थित होते. परेश बरुआ यांच्या नेतृत्वाखालील उल्फा गट या सामंजस्य करारात सहभागी झालेला नाही.

#WATCH | On United Liberation Front of Assam (ULFA) signing a tripartite Memorandum of Settlement with the Centre and the Assam government, Assam CM Himanta Biswa Sarma says, "Except for one individual who is now leading the anti-talk faction of ULFA. All the founding members of… pic.twitter.com/k88m2MK6h7

— ANI (@ANI) December 29, 2023

कोणत्या मुद्द्यावर करार झाला?
आसामचा सांस्कृतिक वारसा अबाधित ठेवला जाईल.
आसाममधील लोकांना रोजगाराच्या संधी राज्यातच उपलब्ध करून दिल्या जातील.
सशस्त्र बंडखोरांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सरकार करेल.
सशस्त्र बंडखोरांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील, ते केले जातील.

 

आसामच्या भविष्यासाठी महत्त्वाचा निर्णय – शाह
“माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. आसामच्या भविष्यासाठी आज एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. दीर्घ काळापासून आसाम आणि संपूर्ण ईशान्य भारताने हिंसेचा सामना केला. जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाज हाती घेतले, तेव्हापासून ईशान्य भारत आणि दिल्लीमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. खुल्या मनाने सर्वांशी संवाद साधला. या संवादातूनच कट्टरतावाद, हिंसा आणि वादांपासून मुक्त असलेला ईशान्य भारताची कल्पना मांडली गेली आणि त्यानुसार गृहमंत्रालयाने काम केले. मागच्या पाच वर्षांत ईशान्य भारतातील वेगवेगळ्या राज्यात नऊ शांतता आणि सीमा संबंधित करार करण्यात आले आहेत. यामुळे ईशान्य भारतात शांतता प्रस्थापित झाली”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

नऊ हजारपेक्षा अधिक बंडखोरांचे आत्मसमर्पण

अमित शाह पुढे म्हणाले, “नऊ हजारपेक्षा अधिक बंडखोरांनी आत्मसमर्पण केले आहे. आसामबाबत बोलायचे झाल्यास ८५ टक्के परिसरातून AFSPA ला हटविण्यात आले आहे. आज भारत सरकार, आसाम सरकार आणि युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसम (ULFA) यांच्यात त्रिपक्षयी करार झाला आहे. या करारामुळे आसाममधील सशस्त्र बंडखोरांना शांत करण्यात आपण यशस्वी झालो आहोत. आसामच्या शांतीसाठी हा करार खूप महत्त्वाचा आहे. उल्फाच्या सर्व बंडखोरांनी लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याचे वचन दिले आहे, ही घटना आम्हाला आनंद देणारी आहे.”

Web Title: Peace deal between central state government and militant outfit ulfa to end terrorism in assam nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2023 | 08:21 PM

Topics:  

  • State Governments

संबंधित बातम्या

म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे…; हिंदी भाषा सक्तीवरून अरविंद जगतापांची टीका
1

म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे…; हिंदी भाषा सक्तीवरून अरविंद जगतापांची टीका

भटक्या कुत्र्यांचा चावा ठरतोय जीवघेणा! केंद्रीयमंत्र्यांनी महाराष्ट्राबाबत दिली धक्कादायक माहिती
2

भटक्या कुत्र्यांचा चावा ठरतोय जीवघेणा! केंद्रीयमंत्र्यांनी महाराष्ट्राबाबत दिली धक्कादायक माहिती

शाळांचे ‘जियो टैगिंग’ करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आढावा बैठकीमध्ये आदेश
3

शाळांचे ‘जियो टैगिंग’ करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आढावा बैठकीमध्ये आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.