Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला, अनेक कलाकारांचा सहभाग!

मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: Jul 06, 2021 | 01:56 PM
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला, अनेक कलाकारांचा सहभाग!
Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या वास्तववादी चित्रपटाच्या प्रदर्शनाने ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपल्या आगामी वेबसिरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. आता नव्या रूपात भेटीला आलेल्या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रेक्षकांना मनोरंजनाचा खजिना उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे.  ‘म… मानाचा,  म… महानतेचा, म… मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल असून प्लॅनेट मराठी ओटीटीच्या लोगोला अनुसरून हे बोल आहेत. मराठी सिनेसृष्टीतील तारेतारका या ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार झाले आहे. 

मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पुष्कर श्रोत्री यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यात अक्षय बर्दापूरकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, शरद केळकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, संजय जाधव, अभिजीत पानसे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सोनाली खरे, भार्गवी चिरमुले, पर्ण पेठे, स्मिता तांबे, गायत्री दातार, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री मिलिंद, नेहा शितोळे, दीप्ती देवी, संदीप पाठक, निखिल चव्हाण, तेजस बर्वे, सुरभी हांडे, सुव्रत जोशी आणि शिवानी बावकर यांचा सहभाग आहे. 

 या गौरव गीताविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असेल. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ आणि आम्हाला आशा आहे हा मनोरंजनाचा खजिना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला याचीही खात्री आहे, हे गौरव गीतही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. आपल्या मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा सातासमुद्रापार पोहोचवण्याचा आणि मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न या गौरवगीतामधून करण्यात आला आहे. तसेच या गौरव गीतामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे या गाण्याला चारचाँद लागले आहेत. मुळात मराठी सिनेसृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले आहे. वेळात वेळ काढून  या गाण्यात, परिवारात सहभागी झालेल्या सर्व तारेतारकांचे मनापासून आभार.”

Web Title: Planet marathi song on ott platform nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2021 | 01:56 PM

Topics:  

  • planet marathi

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.