Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन, राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा

“सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटले.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 17, 2021 | 11:43 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन, राज्यपालांनी दाखवला हिरवा झेंडा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, “सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी म्हटले.

सायकल रॅलीचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करून राज्यपाल कोश्यारी म्हणाले,  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ट्रायथलेट कौस्तुभ राडकर, सायकलपटू सुनीता नाडगीर, एकादशी कोल्हटकर, निरुपमा भावे, जुगल राठी, ट्रायथलेट आणि ट्रेकर निलेश मिसाळ, योग प्रशिक्षक आरती चव्हाण, आयर्नमॅन मेघ ठकार आणि आयोजकांचा सत्कार करण्यात आला.

प्रस्ताविकात प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, पुणे हे सायकलिंचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.

Web Title: Pune on pedals cycle rally organized on the occasion of prime minister narendra modis birthday governor shows green flag nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2021 | 11:43 AM

Topics:  

  • Governor Bhagatsing Koshyari
  • Prime Minister Narendra Modi
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…
1

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं
2

Pune Crime: ‘वडील गंभीर आहेत’ आणि…; बनावट इमर्जन्सी कॉलने डॉक्टरांना बोलावलं अन् चाकूच्या धाकात लुटलं

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार
3

Pune Election News: पिंपरी प्रभाग १५ मध्ये भाजपची ‘विकास वारी’; अमित गावडे आणि शरद मिसाळ यांच्या पॅनेलचा झंझावाती प्रचार

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद
4

Pune Political News: भाजपची ‘सत्तेची मस्ती’ उतरवा! प्रभाग २१ मध्ये संदीप वाघेरे आणि पॅनेलला सोसायट्यांचा उदंड प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.