Rohit Sharma First Reaction On Ashwin Retirement Rohit Sharma Said He Wanted to retire in Perth Itself Forced to play in Adelaide
Ind vs Ban 2nd Test R Ashwin’s New Record : भारत विरुद्ध बांगलादेश दुसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशला प्रथम फलंदाजी करण्यासाठी बोलावले. डाव संपला तेव्हा बांगलादेशने 3 गडी गमावून 107 धावा केल्या. बांगलादेशने 35 षटकांमध्ये 3 विकेट गमावून 107 धावा केल्या होत्या.
रविचंद्रन अश्विनने नवीन विक्रम केला नावावर
L.B.W!
The Bangladesh Captain departs as @ashwinravi99 strikes soon after Lunch!
Live – https://t.co/JBVX2gyyPf#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/13ZhY7pIyy
— BCCI (@BCCI) September 27, 2024
अश्विनच्या नावावर नवीन विक्रम, अनिल कुंबळेचा मोडला रेकॉर्ड
रविचंद्रन अश्विन मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत अनिल कुंबळेपेक्षा खूपच मागे आहे. पण, आता अश्विन हा आशियाई खेळपट्ट्यांवर सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज बनला आहे. आर अश्विनने कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा कर्णधार नझमुल शांतोला बाद केले, ही त्याची आशियातील 420 वी विकेट होती. त्याच्या आधी अनिल कुंबळेने आशियामध्ये एकूण 419 विकेट घेतल्या होत्या.
आशियातील सर्वाधिक वेकट्स घेणारा गोलंदाज….
आता आशियामध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रविचंद्रमन अश्विन केवळ मुथय्या मुरलीधरनच्या मागे आहे. मुथय्या मुरलीधरनने आशियामध्ये 612 विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेचा रंगना हेराथ ३५४ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.
कानपूर कसोटी बांगलादेशची खराब सुरुवात
कानपूर कसोटीत बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली कारण झाकीर हसनने 24 चेंडू खेळले पण त्याला एकही धाव करता आली नाही. आकाशदीपने त्याला यशस्वी जैस्वालकरवी झेलबाद केले. त्यानंतर काही वेळातच आकाशदीपने शादमान इस्लामला पायचित करीत तंबूचा रस्ता दाखवला. इस्लामने 24 धावा केल्या. भारतीय कर्णधार रोहित शर्माने आठव्या षटकातच फिरकीपटूला आणले. रविचंद्रन अश्विनने ब-याच प्रयत्नांनंतर कर्णधार नजमुल शांतोची विकेट मिळवली, त्याने 31 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.