Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raigad News : धुक्यात हरवला माथेरान; नेरळ माथेरान घाटरस्त्यात पर्यटकांची गर्दी

: राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून मुंबई आणि उपनगरीय परिसरात हवेत गारवा जाणवत आहे. अशातच आता सलग दोन ते तीन दिवस माथेरान आणि परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नेरळ माथेरान घाटात धुक्याची दुलई दिसून येत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 08, 2025 | 06:07 PM
Raigad News : धुक्यात हरवला माथेरान; नेरळ माथेरान घाटरस्त्यात पर्यटकांची गर्दी
Follow Us
Close
Follow Us:

माथेरान/ संतोष पेरणे : राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून मुंबई आणि उपनगरीय परिसरात हवेत गारवा जाणवत आहे. अशातच आता सलग दोन ते तीन दिवस माथेरान आणि परिसरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसामुळे नेरळ माथेरान घाटात धुक्याची दुलई दिसून येत आहे.घाटातील ढगाळ वातावरणामुळे नेरळ माथेरान घाटात आणि माथेरान शहरात सर्वत्र धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे. अवकाळी पावसाने हिरवागार झालेल्या घाटरस्त्याला भेट देण्य़ास पर्यटकांची गर्दी होत आहे.

सोमवारी सायंकाळी माथेरान शहरात तर कर्जत तालुक्यातील बहुसंख्य भागात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अवकाळी पाऊस आला होता.त्यानंतर मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पाऊस आला.हा अवकाळी पाऊस संध्याकाळी चार वाजल्यापासून पुन्हा सुरू झाला आणि रात्री पर्यंत अवकाळी पाऊस बरसत होता.त्या सर्व पावसामुळे नेरळ माथेरान घाट रस्त्यात सर्वत्र धुक्याची दुलई पसरली होती.या धुक्यामुळे नेरळ माथेरान घाटातील झाडांमधून अंगावर येणारे धुके अनुभवण्यासाठी हौशी पर्यटक नेरळ माथेरान घाटात सैर करू लागले आहेत.त्याचवेळी त्या धुक्यातून येणारे जाणारी वाहने यांना गाडीच्या हेड लाईट चालू करूनच प्रवास करावा लागत होता.तर दुचाकी वरून जाणारे दुचाकीस्वार हे देखील धुक्यातून वाहने चालविण्याचा आनंद घेत आहेत.सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळी नेरळ माथेरान घाटात निर्माण झालेली धुक्याची दुलई अनुभवण्यासाठी गर्दी दिसून येत आहे.

माथेरान घाट तसेच माथेरान शहरात सर्व ठिकाणी अवकाळी पावसामुळे धुकेमय वातावरण तयार झाले आहे.त्यात माथेरान मध्ये असलेली झाडांची गर्दी आणि त्या झाडांमधून येणारे धुक्याचे लोट तसेच सर्वत्र निर्माण झालेले फोगी क्लायमेट यामुळे वातावरण आल्हादायक झाले आहे.दुसरीकडे माथेरान शहरात असंख्य ठिकाणी झाडांच्या पलीकडे धुके दिसून येत असल्याने रात्रीच्या अंधारात तर हे धुके प्रचंड आनंद देणारे ठरत आहे.रात्रीच्या अंधाराला दिव्यांच्या प्रकाशात धुक्याची दुलई वेगळे रूप धारण करीत असल्याने स्थानिक आणि पर्यटक आनंदले आहेत.मात्र अवकाळी पाऊस याने गेली काही दिवस वातावरणात निर्माण झालेला उष्मा कमी झाला असून गारवा अधिक वाढला आहे.

Web Title: Raigad news matheran lost in fog crowd of tourists on neral matheran ghat road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Matheran
  • Raigad News

संबंधित बातम्या

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना
1

Karjat News : जमीन खरेदी विक्रीची त्रेधातिरपीट; सरकारी कार्यालयांना जागा मिळता मिळेना

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान
2

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक
3

Karjat News : देशसेवेसाठी महत्वाचं पाऊल; नेरळमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातंय कमांडो प्रात्यक्षिक

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
4

Karjat News : रस्त्याचं निकृष्ट बांधकाम, अवघ्या सहा महिन्यात खड्डे; संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.