
भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा
Raigad News: रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर आणि पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या अत्यंत संवेदनशील वनक्षेत्रात प्रस्तावित खासगी प्रकल्पांसाठी सुरू असलेली व संभाव्य बेसुमार वृक्षतोड तात्काळ थांबवावी अशी आक्रमक भूमिका ‘टायगर ग्रुप भारत’ संघटनेने घेतली आहे. या प्रकल्पांच्या वन व पर्यावरणविषयक परवानग्यांची सखोल कायदेशीर पडताळणी करावी आणि सुरू असलेल्या सर्व कामांना तात्काळ स्थगिती द्यावी अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या संदर्भात टायगर ग्रुपचे संस्थापक मा. पै. जालिंदरभाऊ जाधव व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पै. तानाजीभाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर तालुक्याच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.मोहिते साहेब यांना सविस्तर लेखी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनाद्वारे प्रशासनाला वस्तुस्थितीची जाणीव करून देत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करण्यात आली.
कर्जत परिसरातील साई डोंगर भागात पंप्ड स्टोरेज प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो हेक्टर वनजमीन वळविण्याचा घाट घातला जात असून हजारो वृक्षांची कत्तल होण्याची भीती निर्माण झाली आहेदुसरीकडे युनेस्को जागतिक वारसा स्थळाचा भाग असलेल्या पश्चिम घाटातील भीमाशंकर परिसरही खासगी प्रकल्पांच्या विळख्यात सापडत आहे भीमाशंकर हे केवळ बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र नसून महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’ याचे नैसर्गिक अधिवास केंद्र व अभयारण्य आहे येथे मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्यास संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची पर्यावरणीय सुरक्षा धोक्यात येईल, असा गंभीर आक्षेप संघटनेने नोंदवला आहे
महाबळेश्वर तालुक्यातून उत्स्फूर्त पाठिंबा महाबळेश्वर वनपरिक्षेत्र कार्यालयात निवेदन सादर करताना स्थानिकांचा मोठा पाठिंबा दिसून आला याप्रसंगी टायगर ग्रुप महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष कुणाल भाऊ राऊत यांच्यासह किशोर भाऊ शिंगरे, सुदेश घाडगे, आशुतोष वेलंगे, ऋषी शिंगरे, राकेश शिंगरे, गौरव, सागर साठे, आतिफ सय्यद, मयुर दवे, साहिल चोरगे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.