Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 10 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashish Shelar : दुष्काळाच्या झळा, शेतकऱ्यांच्या अडचणी अन् आशिष शेलार थेट बांधावर; आदिवासी बांधवांसोबत साजरी केली दिवाळी

Ashish Shelar : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी रायगडमधील कलेगाव येथे आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी मंत्रिमंडळात मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सात आदिवासी वाड्यांतील 389 कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचं वाटपही करण्यात आलं.

  • By विवेक
Updated On: Nov 10, 2026 | 08:22 PM
Ashish shelar diwali at panvel

Ashish shelar diwali at panvel

Follow Us
Follow Us:
  • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासन तत्पर – आशिष शेलार 
  • आदिवासी बांधवांसोबत शेलारांनी घेतला दिवाळीचा आनंद
  • शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीची पाहणी
 

रायगड : राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आपण मंत्रिमंडळात जोरदार मागणी करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. रायगडमधील कलेगाव येथे आयोजित दिवाळी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेतला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. (Ashish Shelar)

पनवेलच्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात मागणी करणार

राज्यातील 305 तालुक्यांमध्ये पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी प्रत्येकी 5 हजार रुपयांची मदत जमा केली आहे. पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी फराळाचा आनंद

या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी आखाडवाडी आदिवासी वाडीतील रोशन वाघमारे यांच्या घरी सहकुटुंब भेट दिली. तिथे त्यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळीचा फराळ घेतला. यावेळी आपल्या आईच्या निधनानंतर गेल्या 10 ते 12 वर्षांत दिवाळीचा आनंद मनापासून अनुभवता आला नव्हता. मात्र, आदिवासी बांधवांसोबत फराळ करताना बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेक वर्षांनंतर दिवाळीचा खरा आनंद मिळाल्याची भावुक भावना त्यांनी व्यक्त केली.

CM Relief Fund : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रीजन्सी ग्रुपचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाखांची मदत

आदिवासी समाजाची लोककला, पारंपरिक नृत्य, गायन आणि निसर्गाशी असलेलं नातं जपण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविण्यात येतील, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

389 कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचं वाटप

या स्नेहमेळाव्यात जिल्हा परिषदेच्या 15 टक्के निधीतून सात आदिवासी वाड्यांमधील 389 कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचं वाटप करण्यात आलं. आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आदिवासी आणि दुर्गम भागातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजनांचा लाभ पोहोचवण्यावर भर दिला.

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

कार्यक्रमानंतर आशिष शेलार यांनी शिरढोण येथील शेतात जाऊन शेतीची पाहणी केली. दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी आमदार महेश बालदी यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करण्यापासून ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यापर्यंत आशिष शेलार यांचा हा रायगड दौरा चर्चेत आला आहे. आता पनवेलच्या शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याबाबत मंत्रिमंडळात काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागलं आहे.

Siddhivinayak Trust : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी बाप्पा धावला! मुख्यमंत्री सहायता निधीला दिली 10 कोटींची मदत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आशिष शेलार यांनी पनवेलच्या शेतकऱ्यांसाठी काय मागणी केली आहे?

    Ans: पनवेल तालुक्यातील शेतकऱ्यांनाही दुष्काळग्रस्त घोषित करावं, अशी मागणी मंत्रिमंडळात करणार असल्याचं आशिष शेलार यांनी सांगितलं.

  • Que: आशिष शेलार यांनी किती कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचं वाटप केलं?

    Ans: जिल्हा परिषदेच्या 15 टक्के निधीतून सात आदिवासी वाड्यांमधील 389 कुटुंबांना शेतीपूरक अवजारांचं वाटप करण्यात आलं.

  • Que: आशिष शेलार यांनी आदिवासी बांधवांसोबत कुठे दिवाळी साजरी केली?

    Ans: रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कलेगाव ग्रामपंचायत हद्दीतील आखाडवाडी आदिवासी वाडीमध्ये त्यांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला.

Web Title: Ashish shelar raigad visit drought farmers panvel adivasi diwali vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2026 | 08:22 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • Diwali 2026
  • drought news
  • panvel
  • Raigad News

संबंधित बातम्या

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित
1

Diwali Pataka Injuries: फटाक्यांमुळे पसरला आयुष्यात ‘अंधार’, 74 जणांच्या डोळ्यांंना इजा, 25 मुलंही बाधित

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज
2

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?
3

Janhavi Tambat Exclusive: पहिला पाडवा, पहिली दिवाळी अन् प्रेमाची कबुली! जान्हवी तांबटने सांगितले छवीच्या आयुष्यात काय घडणार?

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: अभिनेत्री पल्लवी जोशींच्या घरी रॉकेटमुळे सोफ्याला आग; विवेक अग्निहोत्रींनची पोस्ट चर्चेत, काय घडलं?
4

Pallavi Joshi-Vivek Agnihotri: अभिनेत्री पल्लवी जोशींच्या घरी रॉकेटमुळे सोफ्याला आग; विवेक अग्निहोत्रींनची पोस्ट चर्चेत, काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.