फोटो सौजन्य - Social Media
भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट सेलने भारतीय रेल्वेत काम करू पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आणली आहे. भारतीय रेलवेमध्ये काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना तसेच रोजगाराच्या शोधात असणाऱ्या लोकांना या भरती प्रक्रियेत संधीचे सोने करता येणार आहे. भारतीय रेलवेमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 4096 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांमध्ये कारपेंटर, फिटर, वेल्डर, इलेक्टरीशिअन, मॅकेनिक, टर्नर, मशिनिस्ट, वायरमॅन सारख्या पदांचा समावेश आहे. या भरती प्रक्रियेत शामिल होण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२४ तारखेला सुरु होणार असून सप्टेंबरच्या १६ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेलने इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी १ महिन्याची मुभा दिली आहे. यादरम्यान अर्ज करणे अनिवार्य आहे अन्यथा वेळ आणि संधी दोन्ही हातातून निसटून जाईल.
विशेष म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवाराला कोणतीही लिखित किंवा संगणक आधारित परीक्षा द्यावी लागणार नाही आहे. त्याचबरोबर उमेदवाराची कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही आहे. या भरती प्रक्रियेत उमेदवाराचे १०वीचे गूण तसेच ITI मध्ये प्राप्त गूण महत्वाचे ठरणार आहेत. याच गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भात मेरिट लिस्ट नोव्हेंबर २०२४ ला जाहीर करण्यात येईल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होणार असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रेल्वे रिक्रुटमेंट सेलच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागणार आहे. www.rrcnr.org रेल्वे रिक्रुटमेंट सेल उत्तर रेल्वेचे संकेतस्थळ आहे.
अर्ज करण्याअगोदर उमेदवार काही गोष्टींमध्ये पात्र असणे गरजेचे आहे. या याशिवाय निवड केली जणार नाही. भरती प्रक्रियेत काही वयोमर्यादा आहेत. उमेदवाराचे वय १८ ते २४ दरम्यान असणे गरजेचे आहे. महत्वाचे म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट सेलने आरक्षित प्रवर्गांना वयोमर्यादेत काही प्रमाणात सूट दिली आहे. OBC प्रवर्गासाठी अधिक तीन वर्षांची सूट दिली आहे, तर SC/ST प्रवर्गांना पाच वर्षांची सूट दिली गेली आहे. महत्वाचे म्हणजे विकलांग उमेदवारांना अधिक १० वर्षांची सूट दिली आहे.
शिक्षण पात्रतेमध्ये उमेदवार जास्त शिक्षित असणे गरजेचे नाही. उमेदवाराची दहावी झालेली असावी तसेच उमेदवाराने ITI केलेले असावे. उमेदवाराला दहावीत किमान ५०% तरी असावेत आणि पदाच्या संबंधित ITI प्रमाणपत्र असावेत. अर्ज प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना अर्ज शुल्काचे भुगतान करावे लागणार आहे. SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना तसेच महिला आणि दिव्यांग उमेदवाराकडून कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही. इतर प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून १०० रुपये भरावे लागणार आहे. निवडप्रक्रियेत यशस्वी उमेदवाराला कामासंबंधित प्रशिक्षण देण्यात येईल.