Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज ठाकरे आज ‘शिवतीर्थ’ या नव्या घरात प्रवेश करणार, कसे आहे राज याचं नवं घर ‘शिवतीर्थ’?

मनसेप्रमुख राज ठाकरे हे नव्या ‘शिवतीर्थ’ या घरात कधी प्रवेश करणार याबाबत जोरदार चर्चा सूरू होती. परंतु त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. मागील वीस वर्षापासून राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ या बंगल्यावर राहत होते, ‘कृष्णकुंज’ हा बंगला अनेक राजकीय घटनांचा साक्षीदार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर राहत असतानाच स्थापन झाली होती. तसेच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे पाय ‘कृष्णकुंज’ या बंगल्याला लागले आहेत. राज यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर येत असत. परंतू आता राज यांनी घर बदलल्यामुळं त्यांचा नवीन पत्ता शिवाजी पार्कच्या बाजूला ‘शिवतीर्थ’ हा असेल.

  • By Amrut Sutar
Updated On: Nov 06, 2021 | 01:48 PM
राज ठाकरे आज ‘शिवतीर्थ’ या नव्या घरात प्रवेश करणार, कसे आहे राज याचं नवं घर ‘शिवतीर्थ’?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे पाडव्याच्या शुभ मूहूर्तावर शिवाजी पार्क येथील ‘शिवतीर्थ’ या नव्या घरात प्रवेश करणार आहेत, राज ठाकरे हे नव्या ‘शिवतीर्थ’ या घरात कधी प्रवेश करणार याबाबत जोरदार चर्चा सूरू होती. परंतु त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे. आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज ठाकरे नव्या घरात प्रवेश करणार आहेत. मागील वीस वर्षापासून राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ या बंगल्यावर राहत होते, ‘कृष्णकुंज’ हा बंगला अनेक राजकीय घटनांचा साक्षीदार आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर राहत असतानाच स्थापन झाली होती. तसेच विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे पाय ‘कृष्णकुंज’ या बंगल्याला लागले आहेत. राज यांना भेटण्यासाठी अनेक दिग्गज ‘कृष्णकुंज’ बंगल्यावर येत असत. परंतू आता राज यांनी घर बदलल्यामुळं त्यांचा नवीन पत्ता शिवाजी पार्कच्या बाजूला ‘शिवतीर्थ’ हा असेल.

नवं घर कसं असेल याबाबत उत्सुकता
मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा गृहप्रवेश आणि नव्या घराचं नाव काय असेल, याचं सगळ्यांनाच कुतूहल होतं. त्यामुळे राज यांचं शिवतीर्थ आतूनबाहेरून कसं आहे याबाबतची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. गृहप्रवेशासाठी वास्तूशास्त्र विशारद, पंचांग आणि तज्ञ जाणकार यांच्याकडून सल्ला घेऊनच मुहूर्त निवडण्यात आलाय. शनिवारी गृहप्रवेश करत असलेल्या राज ठाकरे यांच्या घरात नक्की डिजाईन कशी असेल, कोणत्या मजल्यावर काय काय असेल, याबाबत त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि सर्वसामान्यांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे. मुळात व्यंगचित्रकार, कलाकार, जाणकार आणि अभ्यासूवृत्ती यामुळं राज यांनी घरातील सर्व गोष्टी विचारपूर्वक केल्या असतील अशी शक्यता आहे.

‘कृष्णकुंज’चा इतिहास
मनसेप्रमुख राज ठाकरे हे २००० साली आपल्या कुटुंबासोबत ‘कृष्णकुंज’या बंगल्यावर राहायला आले. राज ठाकरे त्याआधी ‘कदम मेन्शन’मध्ये राहत होते. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे अशी दोन कुटंबं राहत होती. याच ‘कदम मेन्शन’मध्ये शिवसेनेची स्थापना झाली होती. तेव्हा दोन परिवार या घरात राहात होते. कालांतराने बाळासाहेब वांद्र्यातील ‘मातोश्री’त राहायला गेले. राज ठाकरे ‘कृष्णकुंज’ मध्ये राहायला गेल्यानंतर त्यांची बहीण जयजयवंती आपल्या कुटुंबासह तिथे राहत आहे. ‘कृष्णकुंज’तील घर आधी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी घेण्याचं ठरवलं होतं, मात्र काही कारणास्तव त्यांनी ‘कृष्णकुंज’तील ते घर घेतलं नाही. त्यानंतर लता मंगेशकर यांनी तेव्हा राज ठाकरे यांना कृष्णकुंजमधील घर घेण्याचं सुचवलं होते, राज ठाकरे हे सुद्धा नवं घर घेण्याच्या विचारात होते आणि त्यांनी ते घर घेतलं. त्यानंतर राज ठाकरे वीस वर्षापूर्वी कृष्णकुंज येथे राहयला आले. कृष्णकुंजमध्ये अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते, सेलिब्रिटी, क्रीडापटू अशा दिग्गजांनी भेटी दिल्या आहेत.

‘शिवतीर्थ’ हे राज ठाकरे यांचं नवं घर कसे असेल?
‘शिवतीर्थ’ हे राज ठाकरे यांचं नवं घर शिवाजी पार्क येथे आहे. या नव्या घराच्या उभारणीचे काम अंदाजे दोन ते अडीच वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. घराचा दर्शनी भाग शिवाजी पार्कच्या दिशेने आहे. या नव्या घराला एकूण ६ मजले आहेत. सिनेमाप्रेमी असलेल्या राज ठाकरेंच्या या नव्या घरात होम थिएटर आहे. या घराचे बांधकाम सुरू असताना स्विमिंग पूल बांधयाचे ठरवले होते, पण काही कारणास्तव रद्द करण्यात आला.

घरचे डिझाईन राज यांच्या संकल्पनेतून
सुत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी या नव्या घरातील फर्निचर विदेशातून मागवले आहे. नव्या घराचं संपूर्ण डिझाईन राज यांनी स्वत: लक्ष घालून तयार करून घेतलंय. घरातील झुंबर, फर्निचर, आदी वस्तू स्वत: राज यांनी डिझाइन करून करून घेतल्या आहेत. काही फर्निचर मात्र परदेशातून तर काही फर्निचर भारतातून घेतलंय. राज ठाकरेंचे चिरंजीव अमित यांना मात्र त्यांनी त्यांची खोली त्यांच्या संकल्पनेनुसार तयार करण्याची मुभा दिली. मात्र संपूर्ण घराची मांडणी, सजावट, आखणी हे राज ठाकरे यांच्या मार्गदर्शाखाली झाले आहे.

पक्ष बैठका, पत्रकार परिषदा, वाचनालय आणि जीमही
या नवीन घरातील पहिल्या मजल्यावर प्रशस्त डायनिंग हॉल आहे. घराच्या सर्वात वरच्या मजल्यावर अत्याधुनिक व्यायामशाळाही आहे. तळमजल्यावर पक्ष कार्यालयीन कामासाठी, म्हणजेच पक्ष बैठका आणि पक्षप्रवेश, पत्रकार परिषदा यांसारखे इव्हेंट होण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीय. त्याशिवाय एक सुसज्ज असं वाचनालयही आहे. मुळात राज ठाकरे हे कलाकार आहेत, त्यामुळे त्यांना वाचनाची आवड आहे, त्यामुळं एक वाचनालय उभारण्यात आलं आहे.

‘शिवतीर्थ’ या नवीन घरात पहिला पाहून कोण?
मनसेप्रमुख राज ठाकरे पाडव्याच्या शुभ मूहूर्तावर म्हणजे आज शनिवारी सांयकांळी शिवाजी पार्क येथील ‘शिवतीर्थ’ या नव्या घरात प्रवेश करणार आहेत. राज ठाकरे कृष्णकुंज या बंगल्यावर राहयला असताना, त्यांना विविध क्षेत्रातील दिग्गज भेटायला येत असत, त्यामुळं राज ठाकरे यांच्या नवीन ‘शिवतीर्थ’ या घरात पहिला पाहूणा कोण येणार? राज ठाकरे यांना भेटायला पहिला दिग्गज व्यक्ती कोण असेल? याबाबत कार्यकर्ते आणि माध्यमांत उत्सुकता आहे. राज यांचे सर्व क्षेत्रातील व्यक्तींशी चांगले संबंध आहेत. त्यामुळं राज ठाकरे गानकोकिळा लता मंगेशकर यांना निमंत्रित करणार का? की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनाही निमंत्रित करणार का? तसेच रतन टाटा, भारतरत्न सचिन तेंडुलकर, बिग बी अमिताभ बच्चन आदी दिग्गजांना राज ठाकरे आमंत्रित करु शकतात, अशी अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Raj thackeray will enter the new house shivteerth today how is rajs new house shivteerth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2021 | 01:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.