navneet and ravi rana
मुंबई : चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या जामीन अर्जावर २९ एप्रिल होणार असल्याची माहिती सरकारी वकील प्रदीप घरत यांनी दिली आहे.
[read_also content=”हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्व शिकवले – जयंत पाटील https://www.navarashtra.com/latest-news/marathwada/jayant-patil-says-that-balasaheb-thackeray-taught-hindutva-to-bjp-nrps-272602.html”]
दरम्यान, राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. तूर्तास आमदार रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात होणार असून खासदार नवनीत राणा यांना भायखळा येथील महिलांसाठी असलेल्या पाठवण्यात येणार आहेे.
काल मुंबईत हनुमान चालीसा पठणावरून झालेल्या राड्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली . आज त्या वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांच्या जामीन अर्जवर सुनावणी होणार आहे. मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य केल्याप्रकरणी राणांना अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा ठपका राणा दाम्पत्यावर ठेवण्यात आला आहे.