Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 23 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा खास चित्ररथ; छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र हा खास चित्ररथ सादर करण्यात आला. "लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज" या संकल्पनेवर अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 26, 2024 | 01:20 PM
दिल्लीच्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा खास चित्ररथ; छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना
Follow Us
Follow Us:

दिल्ली : आज देशभर सर्वत्र उत्साहामध्ये अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन (Republic Day 2024) साजरा केला जात आहे. सर्वत्र ध्वजवंदन आणि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीतील (Delhi) कर्तव्यपथावर होणारा सोहळा प्रजासत्ताक दिनाचे खास आकर्षण ठरत असतो. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानाच्या (PM Narendra Modi) साक्षीने पार पडणार नेत्रदीपक सोहळा (Republic Day Parade) आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत असतो. यावेळी विविध परेडसह साहसी प्रात्यक्षिके केली जातात. त्याचबरोबर भारताची विविधेतून एकता दर्शवणारे राज्यांचे चित्ररथ (Chitrarath) देखील सामील झालेले असतात. यावर्षी महाराष्ट्राचा देखील कर्तव्यपथावर भव्य असा चित्ररथ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) खास मानवंदना देणारा महाराष्ट्राचा चित्ररथ होता.

दिल्लीच्या कर्तव्यपथावर वेगवेगळ्या राज्याच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होत असते. विविधतेतून एकता जपणारे भारताचे हे जणू एक प्रतिबिंबच असते. हा सोहळा संपूर्ण देशाभरासाठी उत्साह निर्माण करणार असतो. सैन्याच्या विविध तुकड्यांचे संचलन तसेच परेड व प्रात्यक्षिके डोळे दिपवणारी असतात. यामध्ये एक मह्त्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य मांडणारे खास चित्ररथ. हे चित्ररथ त्या त्या राज्याची खासियत, परंपरा आणि इतिहास याचे दर्शन घडवत असते. या चित्ररथामुळे आपला भारत देशाची समृद्ध वारसा आणि परंपरा जगासमोर येते. या चित्ररथाच्या पंरपरेमध्ये आपला महाराष्ट्र देखील आपली वेगळी ओळख जपत आणि वाढवत असतो. यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक दिनाच्या या खास चित्ररथातून मानवंदना देण्यात आली.

“लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज चित्ररथ”

महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याची दिमाखदार दृश्ये दाखवण्यात आली. यामध्ये पुढे राजमाता जिजाऊ व बालशिवराय यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. जिजाऊ शिवरायांना स्वराज्याची शिकवण देत असल्याचे या मोठ्या प्रतिकृतीमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ प्रतिकृती दाखवण्यात आली. याचबरोबर चित्ररथामध्ये शिवरायांसमोर मोठा तराजू देखील दाखवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र हा खास चित्ररथ सादर करण्यात आला. “लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला. त्याचबरोबर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या ग्रुपने ढाल, तलवार, लाठी काठी यांसारखी प्रात्यक्षिके करुन दाखवली. यावेळी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableau) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प (Sculpture) यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची कलाकृती दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकली.

 

Web Title: Republic day india 75th prajasattak din 26 january delhi parade photos videos pm modi rajpath delhi maharshtra chitrarath nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2024 | 01:19 PM

Topics:  

  • delhi
  • maharashtra
  • Republic Day

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट
1

Devendra Fadnavis : ड्रग्जविरोधात सरकारचा मोठा निर्णय; प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उभारणार विशेष युनिट

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
2

अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार; परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण
3

Anna Hazare : केंद्र सरकारला अण्णा हजारेंचा इशारा; RTI नियमांतील बदल मागे न घेतल्यास 5 जुलैपासून उपोषण

अवचितगडावर लागला दोन ऐतिहासिक तोफांचा शोध! दुर्गप्रेमींच्या जिद्दीला यश!
4

अवचितगडावर लागला दोन ऐतिहासिक तोफांचा शोध! दुर्गप्रेमींच्या जिद्दीला यश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.