Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

हडपसरच्या चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या भाजी मंडईतील सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 17, 2026 | 12:30 AM
हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

हडपसरमध्ये मध्यरात्री थरार; सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला, दोघे पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
Follow Us:
  • सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने हल्ला
  • दोघांना अटक; एक आरोपी फरार
  • दहा कारसह बसची तोडफोड
पुणे : हडपसरच्या चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या भाजी मंडईतील सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मोहम्मद हुसैन ऊर्फ अज्जु शब्बीर शेख (रा. सय्यदनगर, हडपसर) आणि अविनाश सतिश केकाण (वय १८, रा. वानवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिद्दार्थ खिलारी (रा. ससाणेनगर) हा आरोपी अद्याप फरार आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांना १७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास हडपसर भाजी मंडई परिसरात हा प्रकार घडला आहे. आरोपींनी महापालिकेचे सुरक्षा रक्षक आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २७) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात कोठावळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी सुरक्षा रक्षकाच्या वडिलांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : हॉटेलसमोर जुन्या वादाचा थरार, तरुणावर चाकूने हल्ला करून हत्या; सहा आरोपी ताब्यात

दहा कार आणि बसची तोडफोड

सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. पळून जात असताना त्यांनी जेएसपीएम महाविद्यालयाजवळील आदर्शनगर परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांची कोयत्याने तोडफोड केली. आरोपींनी तब्बल दहा कार आणि एका बसचे नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून दोन आरोपींना अटक केली. वाहनांच्या तोडफोडीप्रकरणी आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी सिद्दार्थ खिलारी याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक गुरव करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : गुजरातच्या जेलमधून माफिया राज; केंद्रीय गृहमंत्रीच ही गँग चालवतात, हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: हडपसर भाजी मंडईतील हल्ल्यात कोण जखमी झाले?

    Ans: महापालिकेचे सुरक्षा रक्षक आकाश लक्ष्मण कोठावळे (वय २७) यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. ते गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • Que: या प्रकरणात किती आरोपींना अटक झाली आहे?

    Ans: मोहम्मद हुसैन ऊर्फ अज्जु शब्बीर शेख आणि अविनाश सतिश केकाण या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दार्थ खिलारी हा आरोपी फरार आहे.

  • Que: आरोपींनी वाहनांचीही तोडफोड केली का?

    Ans: होय. सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी आदर्शनगर परिसरात दहा कार आणि एका बसची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: An incident has occurred in hadapsar where a security guard was assaulted by two individuals nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!
1

रात्रीच्या अंधारात मुलींना अर्ध्या रस्त्यात उतरवणं पडलं महागात! एसटी चालक-वाहकांचे निलंबन, परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा!

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
2

Bhandara News: भंडारा-मुंढरी बसमधील प्रकार; दोन विद्यार्थिनींना अंधारातच उतरविले! विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत
3

वीजबिल वसुलीचे महावितरणसमोर मोठे आव्हान; पुणे विभागात तब्बल 438.8 कोटी रुपये थकीत

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! फोर्स वन कमांडोंचे प्रशासकीय नियंत्रण आता ATSकडे, दहशतवादविरोधी यंत्रणेत महत्त्वाचा बदल
4

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! फोर्स वन कमांडोंचे प्रशासकीय नियंत्रण आता ATSकडे, दहशतवादविरोधी यंत्रणेत महत्त्वाचा बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.