Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५०० रुपयांचा थर्मास, पाच लाखांची लूट, ऑनलाईन शॉपिंग करताना नागपूरच्या ग्राहकाची फसवणूक

ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. नागपुरातील एका व्यक्तीला 500 रुपयांची शॉपिंग तब्बल 5 लाखांना पडली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jul 23, 2021 | 07:14 PM
५०० रुपयांचा थर्मास, पाच लाखांची लूट, ऑनलाईन शॉपिंग करताना नागपूरच्या ग्राहकाची फसवणूक
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).  ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या ग्राहकांनी आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगणं कसं गरजेचं आहे, हे अधोरेखित करणारी एक घटना समोर आली आहे. नागपुरातील एका व्यक्तीला 500 रुपयांची शॉपिंग तब्बल 5 लाखांना पडली. गुगलवर सर्च केलेल्या नंबरवर संपर्क केलेल्या ग्राहकाची फसवणूक झाली.

[read_also content=”मुंबई/ मुंबई महापालिकेच्या अभियंता पदोन्नतीत आर्थिक गैरव्यवहार; काँग्रेसचा आरोप सत्ताधारी विरोधकांमध्ये वाद https://www.navarashtra.com/latest-news/financial-malpractice-in-the-promotion-of-mumbai-municipal-corporation-engineer-congress-alleges-nrat-160022.html”]

नेमकं काय घडलं?
मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या एका लोको पायलटने ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन पाचशे रुपयांना खरेदी केलेला थर्मास तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त किमतीला पडला. विकत घेतलेला थर्मास पसंतीस न पडल्याने विज्ञान मेश्राम यांनी तो परत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गुगलवरुन त्यांनी कस्टमर केअरशी संपर्क केला. मात्र ते ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीच्या संपर्कात आले.

टोळीने विज्ञान मेश्राम यांना एनीडेस्क नावाचे सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगितले. त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी विज्ञान मेश्राम यांच्या खात्यातून तब्बल पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम काढून घेत त्यांची फसवणूक केली. या संदर्भात विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

थर्मास परत नेण्याची तक्रार
सारेच काही ऑनलाईन उपलब्ध होऊ लागले असताना फसवणुकीच्या घटना देखील वाढल्या आहेत. नागपूरमधील कपिल नगरच्या शेंडे नगर भागात राहणारे रेल्वे लोको पायलट विज्ञान प्यारेलाल मेश्राम यांनी एका ऑनलाईन साईटवरुन थर्मास विकत घेतला. त्याचे पेमेंटही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने केले होते. निर्धारित वेळेत थर्मासची डिलिव्हरीही झाली, मात्र तो पसंत न आल्याने विज्ञान मेश्राम यांनी थर्मास परत करण्यासाठी त्या कंपनीला रिक्वेस्ट पाठवली.

पैसे परत न मिळाल्याने धावाधाव
कंपनीच्या माणसाने तो थर्मास परत घेऊन गेल्यानंतर काही दिवसांमध्ये पैसे परत मिळतील, असं त्यांना सांगितलं होतं. मात्र पैसे परत न मिळाल्याने विज्ञान मेश्राम यांनी गुगलवरुन त्या कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला आणि त्यांना आपली तक्रार सांगितली. मुळात ते सायबर गुन्हेगारांच्या संपर्कात आले होते.

पैसे परत देण्याच्या बहाण्याने आरोपींनी विज्ञान मेश्राम यांच्याकडून बँकेची सर्व माहिती काढून घेतली, त्यानंतर क्षणात विज्ञान मेश्राम यांच्या बँक खात्यातून 5 लाख 250 रुपये दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर झाले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विज्ञान मेश्राम यांनी कपिल नगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ऑनलाईन शॉपिंग करा, मात्र सावध राहून.

Web Title: Rs 500 thermos rs 5 lakh loot nagpur customer cheated while shopping online nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2021 | 07:14 PM

Topics:  

  • Nagpur
  • online fraud

संबंधित बातम्या

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का
1

D-Martमध्ये धक्कादायक प्रकार! आईस्क्रीममध्ये जे सापडलं ते पाहून ग्राहकाला बसला धक्का

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट
2

मुख्यमंत्र्यांच्या शहरात वर्ल्ड क्लास कन्वेंशन सेंटर; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आणखी एक अनोखी भेट

Breaking : आता रात्रीही सोलर पॅनेलमधून होणार वीज निर्मिती; नव्या तंत्रज्ञानाची कमाल!
3

Breaking : आता रात्रीही सोलर पॅनेलमधून होणार वीज निर्मिती; नव्या तंत्रज्ञानाची कमाल!

Nagpur : भर पावसात वेकोलिच्या खाणीत आग; नेमकं कारण काय?
4

Nagpur : भर पावसात वेकोलिच्या खाणीत आग; नेमकं कारण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.