Sambhaji Bhide's controversial statement regarding Shivarajyabhishek Day on June 6
शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे नेहमीत आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. कधी कधी त्यांची विधाने वादग्रस्त देखील असतात. आता त्यांना गणपती आणि नवरात्र उत्सवाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. गणपती उत्सव, नवरात्रोत्सव असे कार्यक्रम असतात. सणांचा बट्ट्याबोळ सर्वांनी केला. आपला कोण, परका कोण, वैरी कोण अन् कैवारी कोण हे न जाणणारा हिंदू समाज मुर्ख आहे, असे मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी व्यक्त केले.
सांगलीत गुरुवारी घटस्थापनेदिवशी पहाटे सांगली शहरात परंपरेप्रमाणे दुर्गामाता दौड काढण्यास सुरुवात झाली. दुर्गामाता मंदिरात आल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी मंत्रपठण, प्रेरणा मंत्र, आरती सुरू केली. त्यानंतर संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, गणपती उत्सवाचा हा चोथा झाला आहे. नवरात्रोत्सव बट्याबोल केला जात आहे. परंपरेत नको त्या गोष्टी सुरु झाल्या आहेत. उत्सवादरम्यान दांडिया खेळला जातो. हा दांडिया हिंदू समाजाला चुकीच्या दिशेला घेऊन जात आहे. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. या गोष्टी आम्हाला मान्य नाहीत.
187 देशांपैकी 76 देशांनी भारतावर हल्ला केला आहे. बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान आहे. चीन हे आपले शत्रू राष्ट्र आहे, त्याचवेळी तुम्हाला ‘हिंदी-चीनी भाई भाई’चा नारा देणारा पंतप्रधान मिळाला. अशा घोषणेने हिंदू-मुस्लिम ऐक्य निर्माण होते. तसाच नारा हिंदू-मुस्लिम एकतेचा दिला जातो. आपले कोण, परके कोण, शत्रू अन् मित्र, वैरी अन् कैवारी कोण हे न कळणारी आपली हिंदू जमात आहे.
शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवलाय.. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या विचारांवर आपण देश उभा केला आहे. त्यामुळे लढण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.
काही माता-भगिनींनी एकत्र येऊन यापुढे स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. सण, उत्सवात चांगल्या प्रथा महिलांनी सुरु कराव्यात. पोलिसांनी गुराख्यासारखं दौडीसोबत येऊ नये. त्यांनीही डोक्यावर टोपी घालावी. त्यांनीही पळायला हवे, असे भिडे यांनी केले.
राजकारण, सत्ताकारण, अर्थकारण शूद्र आहे. हे थुंकण्याच्या लायकीचे सुद्धा विषय नाहीत. शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न केले पाहिजेत, असे मत भिडे यांनी मांडले.