Samsung आणि Startup India यांच्यात सामंजस्य करार, भारतातील तरूण इनोव्हेटर्सना सक्षम करण्याचा उद्देश
सॅमसंग, भारतातील अग्रगण्य ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड, याने भारत सरकारच्या प्रमुख उपक्रम स्टार्टअप इंडिया सोबत धोरणात्मक सामंजस्य करार (MoU) केला आहे. या सहयोगाचा उद्देश म्हणजे भारतातील दुर्गम भागांतील तरुण इनोव्हेटर्सना सक्षम करणे तसेच Samsung Solve for Tomorrow उपक्रमाद्वारे देशातील स्टार्टअप परिसंस्थेला बळकटी देणे असे आहे.
हा करार नवी दिल्ली येथे पार पडला. यामध्ये Solve for Tomorrow या सॅमसंगच्या प्रमुख देशव्यापी नवोपक्रम स्पर्धेचे आणि Startup India च्या मार्गदर्शन, धोरण पाठिंबा आणि समावेशी नेटवर्कचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. विशेषतः द्वितीय व तृतीय श्रेणी शहरांतील प्रतिभावान तरुणांना शोधून त्यांना पायाभूत सुविधा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेतील संधी आणि आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
Safer Internet India आणि META एकत्र, ऑनलाइन फसवणूक व घोटाळ्यांचा सामना करण्यासाठी केली पार्टनरशिप
सॅमसंग साउथवेस्ट एशियाचे कॉर्पोरेट उपाध्यक्ष एस. पी. चुन म्हणाले, “Solve for Tomorrow चा दृष्टिकोन आणि स्टार्टअप इंडियाचे व्यापक नेटवर्क एकत्र आणत आम्ही भारताच्या दुर्गम भागातील ‘फ्युचर चेंजमेकर्स’ना सक्षम करणार आहोत. हा उपक्रम स्किल इंडिया आणि डिजिटल इंडिया उपक्रमांशी सुसंगत आहे.”
यावेळी भारत सरकारच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे सहसचिव संजीव म्हणाले, “तरुण इनोव्हेटर्सना सक्षम करणे ही भारताच्या विकासगाथेतील एक महत्त्वाची कडी आहे. स्टार्टअप इंडिया आणि सॅमसंग Solve for Tomorrow मधील सहयोगाद्वारे नाविन्यतेवर केंद्रित, समावेशक परिसंस्था निर्माण करण्याचा आमचा दृढ संकल्प आहे. हा उपक्रम दुर्गम भागांतील तरुणांना त्यांच्या कल्पना साकार करण्यास प्रेरित करेल आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल टाकेल.”
WhatsApp New Feature: आता WhatsApp वरून काढलेले फोटोही दिसतील प्रोफेशनल, नव्या अपडेटबाबत सर्व माहिती
Samsung Solve for Tomorrow हा सॅमसंगचा प्रमुख शैक्षणिक व नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, जो तरुणांमध्ये समस्यांवर उपाय शोधणे, सर्जनशीलता आणि सामाजिक प्रभाव निर्माण करण्यासाठी प्रेरणा देतो. यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या समुदायांतील खऱ्या समस्यांची ओळख करून देऊन तंत्रज्ञान, उद्योजकता आणि रचनात्मक विचारसरणीच्या आधारे उपाय शोधण्यासाठी सक्षम केले जाते.
या नव्या पार्टनरशिपमध्ये स्टार्टअप इंडिया आपल्या समावेशक नेटवर्कचा लाभ देईल, तर सॅमसंग थेट अभ्यास, नवोन्मेष स्पर्धा आणि क्रियाशील सहभागाच्या माध्यमातून तरुण इनोव्हेटर्सपर्यंत पोहोचेल.
सॅमसंग इंडिया आणि स्टार्टअप इंडिया यांच्यातील हा सार्वजनिक-खाजगी सहभाग मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्किल इंडिया या मिशन्सना बळकटी देतो आणि भारताच्या उत्पादन-केंद्रित तंत्रज्ञान भविष्यामध्ये स्थानिक इनोव्हेटर्सना प्राधान्य देतो.
Solve for Tomorrow हा उपक्रम प्रथम 2010 मध्ये अमेरिकेत सुरू झाला होता. आज तो 68 देशांमध्ये कार्यरत असून, जगभरातील 30 लाखांहून अधिक तरुणांनी यात सहभाग घेतला आहे. 2025 च्या आवृत्तीत टॉप 4 विजेत्या टीम्सना 1 कोटी रुपयांचे अनुदान आणि समावेशन कार्यक्रम दिला जाईल. टॉप 20 टीम्सना प्रत्येकी 20 लाख रुपये, तर टॉप 40 टीम्सना 8 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
या वर्षी विद्यार्थ्यांना चार प्रमुख थीम्सवर आधारित उपाय तयार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
या उपक्रमांतर्गत बिहारमधील समस्तीपूर, आंध्र प्रदेशातील गुंटूर, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि आसाममधील काचर यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांतील प्रतिभावान तरुणांचा शोध घेण्यात आला.