IFFI मधील ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी काश्मीर फाइल्स चित्रपटाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलंय. त्यानंतर चित्रपटसृष्टीत नव्या वादाला तोंड फुटलं आहे. कलाकारांपासून तर राजकीय व्यक्तीही या प्रकरणी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एकीकडे आता गोवा भाजपचे प्रवक्ते सॅव्हियो रॉड्रिग्स यांनी लॅपिड यांच्या वक्तव्याला काश्मिरी हिंदूंचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी नदाव लॅपिडच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
[read_also content=”खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते…अनुपम खेर यांच नदाव लॅपिड यांना प्रत्यु्त्तर https://www.navarashtra.com/movies/anupam-kher-answer-to-nadav-lapid-on-controversial-his-statement-about-kashmir-files-nrps-349400.html”]
इफ्फीच्या ज्युरी प्रमुखांच्या टीकेचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले, चित्रपटाबाबत त्यांचे विधान खरे आहे. हा चित्रपट म्हणजे एका पक्षाचा दुसऱ्या पक्षानं केलेला अपप्रचार होता. संपूर्ण पक्ष आणि सरकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते, मात्र या चित्रपटानंतर सर्वाधिक हत्या काश्मीरमध्ये झाल्या. काश्मिरी पंडित आणि सुरक्षा जवान मारले गेले. राऊत म्हणाले, जेव्हा काश्मिरी पंडितांसोबत या घटना घडत होत्या तेव्हा हे काश्मीर फाईल्सवासे कुठे होते.
दरम्यान या प्रकरणावर वक्तव्याला अभिनेते अनुपम खेर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.‘खोट्याची उंची कितीही उंच असली तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते..’ असं ते म्हणाले. ‘आम्ही ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांना योग्य उत्तर देऊ. ज्यूंचा नरसंहार खरा असेल, तर काश्मिरी पंडितांचे निर्गमनही खरे आहे.
IFFI मध्ये या चित्रपटाचं स्क्रिनींग आयोजीत करण्यात आलं होत. ते पाहिल्यानंतर त्यांनी प्रतिक्रीया दिली. नादव लॅपिड यांनी या चित्रपटावर टीका करत म्हण्टलं की हा चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धेत सामील होण्याच्याही लायकीचा नाही. हा चित्रपट केवळ प्रसिद्धीसाठी असल्याचे त्यांनी सांगितले. नादव म्हणाले, ‘हा चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण हैराण आणि अस्वस्थ झालो. हा चित्रपट प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धात्मक विभागासाठी योग्य नाही.