Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Doctor Death Case: महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदणेला मोठा धक्का; न्यायालयाचा मोठा निर्णय 

आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये बदणेने तिच्यावर चार वेळा शारीरिक शोषण केल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 27, 2025 | 01:44 PM
Satara Doctor Death Case:

Satara Doctor Death Case:

Follow Us
Close
Follow Us:

Satara Doctor Death Case:  फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी PSI गोपाल बदणे यांना 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. कोर्टाच्या या आदेशामुळे बदणे यांना मोठा धक्का बसला आहे. आरोपी PSI गोपाल बदणेने आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला काल फलटण न्यायालयात हजर करण्यात आले होते. आत्महत्येपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या सुसाईड नोटमध्ये बदणेने तिच्यावर चार वेळा शारीरिक शोषण केल्याचा उल्लेख केला होता. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

काल सातारा जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी, सरकारी वकील अॅड. सुचित्ता वायकर-बाबर यांनी बाजू मांडली. “मरण पावलेली महिला कधी खोटं बोलत नाही. आरोपीवर गंभीर आरोप आहेत. त्याचा मोबाईल, वाहन आणि वैद्यकीय तपास करणे गरजेचे आहे, तसेच घटनास्थळाची तपासणीही आवश्यक आहे. त्यासाठी आरोपी बदणे याला 7 दिवसांच्या पोलिस कोठडी देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली.

Satara Doctor Death Case: लग्नाची मागणी आणि शारिरीक संबंधांसाठी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

तर अॅड. राहुल धायगुडे यांनी आरोपी गोपाल बदणे याची बाजू मांडली.   “माझा क्लायंट निर्दोष आहे. त्याला या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे फक्त 1 दिवसाची कोठडी पुरेशी आहे.” असे धायगुडे यांनी सांगितले. तदोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर सह-दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे यांनी PSI गोपाल बदणेला 5 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठविण्याचा आदेश दिला.

प्रकरणाची पार्श्वभूमी

सातारा जिल्ह्यातील फलटण शहरात एका महिला डॉक्टरने हॉटेलच्या खोलीत आत्महत्या केली होती. त्या डॉक्टर प्रशांत बनकर यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर भाड्याने राहत होत्या. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता आणि प्रशांतने डॉक्टरांना घर रिकामं करण्यास सांगितलं होतं.

Satara Doctor Death Case: महिला डॉक्टर प्रकरणात PSI बदणेला मोठा धक्का; न्यायालयाचा मोठा निर्णय 

घर सोडल्यानंतर डॉक्टर हॉटेलमध्ये राहू लागल्या आणि काही दिवसांनी त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. सुसाईड नोटमध्ये महिला डॉक्टरने PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर — या दोघांची नावं नमूद केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आरोपी PSI बदणे यांच्या कार, मोबाईल, वैद्यकीय अहवाल आणि घटनास्थळाची फॉरेन्सिक तपासणी सुरू केली आहे. पुढील 5 दिवसांच्या पोलिस कोठडीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Satara doctor death case big blow to psis reputation in the case of a female doctor big decision of the court

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2025 | 09:08 AM

Topics:  

  • Satara Crime News

संबंधित बातम्या

Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन आव्हाडांचा चढला पारा
1

Satara Doctor Death Case: “महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा..; फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरुन आव्हाडांचा चढला पारा

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?
2

Satara Doctor Death Case: डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; दुसऱ्या आत्महत्येशी काय आहे संबंध?

Satara Doctor Death Case: लग्नाची मागणी आणि शारिरीक संबंधांसाठी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
3

Satara Doctor Death Case: लग्नाची मागणी आणि शारिरीक संबंधांसाठी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

Devendra Fadnavis Phaltan News: थोडी जरी शंका असतील तरी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फडणवीसांचे सूचक विधान
4

Devendra Fadnavis Phaltan News: थोडी जरी शंका असतील तरी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात फडणवीसांचे सूचक विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.