लग्नाची मागणी आणि शारिरीक संबंधांसाठी...; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
Satara Doctor Death Case: फलटण उपजिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या २८ वर्षीय डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली सातारा पोलिसांनी आयटी अभियंता प्रशांत बनकर आणि PSI गोपाळ बदने यांना अटक केली आहे. डॉक्टर महिलेच्या सुसाईड नोटमुळे संपूर्ण राज्याचे या प्रकरणाचेलक्ष लागले आहे. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासेही होताना दिसत आहे. अशातच अटक केलेल्या आयटी अभियंता प्रशांत बनकर याच्या बहिणीनेही मृत डॉक्टर महिलेवर गंभीर आरोप केले आहेत.
प्रशांत बनकरच्या भावाने आणि बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, अहवालांवरून असे दिसून येते की त्यांच्या भावाला पुण्यातील फार्महाऊसवर नाही तर फलटण येथील त्यांच्या घरी अटक करण्यात आली होती. पोलिसांनी त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते आणि तो शरण आला.
Pune Jain Housing Board: जैन बोर्डिंग प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा धंगेकरांचा सल्ला; म्हणाले…
प्रशांत बनकरच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या भावाने कधीही संबंधित महिला डॉक्टरशी संपर्क साधला नाही, उलट तीच वारंवार फोन करून त्याला त्रास देत होती. डॉक्टर गेल्या वर्षभरापासून प्रशांत बनकर याच्या घरातच ४००० रुपये मासिक भाड्याने राहत होती.
गेल्या महिन्यात प्रशांत डेंग्यूच्या उपचारासाठी फलटणला आला होता, जिथे संबंधित महिला डॉक्टरने त्याच्यावर उपचार केले. त्यांनी एकमेकांचे नंबरही एक्सचेंज केले होते. १५ दिवसांपूर्वी, डॉक्टर महिलेने प्रशांतला लग्नाचा प्रस्ताव दिला होता, परंतु प्रशांत ने तिने दिलेला लग्नाचा प्रस्ताव नाकारला. दिवाळीच्या काळात डॉक्टर तणावग्रस्त दिसत होती, परंतु तिने कामाच्या ठिकाणी असलेल्या गोष्टींमुळे ती चिंताग्रस्त असल्याचे त्याच्या कुटुंबियांना सांगितले होते. आमची आई तिला स्वतःच्या मुलीसारखी वागवत होती.
Devendra Fadnavis Phaltan News: थोडी जरी शंका असतील तरी…; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेत असलेल्या प्रशांत बनकर याने देखील काही धक्कादायक दावे केले आहेत. डॉक्टरने त्याच्यावर लग्न आणि शारीरिक संबंधांसाठी प्रशांत बनकर याच्यावर दबाव आणत होती. आरोपी आणि मृत यांच्यातील अनेक चॅट आणि कॉल रेकॉर्डिंग तपासण्यात आले आहेत, ज्यामध्ये डॉक्टरने ताण, दबाव आणि इतर समस्यांबद्दल त्याच्याशी चर्चा केली होती.
सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, प्रशांत बनकर याला शनिवारी पहाटे अटक करण्यात आली, तर गोपाळ बदने या उपनिरीक्षकाने रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. न्यायालयाने आरोपी बनकरला २८ ऑक्टोबरपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
डॉक्टर ज्या जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत, त्या बीड येथील रहिवासी असलेल्या उपनिरीक्षकाचे तिच्याशी पूर्वी काही संबंध होते का याचाही पोलिस तपास करत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येनंतर, तिच्या तळहातावर एक संदेशही आढळून आला होता. या सुसाईड नोटमध्ये उपनिरीक्षक आणि घरमालकाच्या मुलाने तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. या चिठ्ठी आणि व्हॉट्सअॅप चॅटमधील मजकुराच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ६४ (बलात्कार) आणि १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.






