Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्याची कन्या शाळा शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन

कन्या शाळेच्या प्राचार्य कविता जगताप म्हणाल्या येत्या २२ ऑक्टोबर रोजी कन्या शाळा सातारा शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे . या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रविंद्र देव, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी व सचिव पी व्ही एस शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . शताब्दी शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संस्थेच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे .

  • By Navarashtra News Network
Updated On: Oct 13, 2021 | 06:57 PM
साताऱ्याची कन्या शाळा शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर ; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार शताब्दी सोहळ्याचे उद्घाटन
Follow Us
Follow Us:

सातारा : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्या शाळा सातारा या शाखेचा शताब्दी सोहळा शुक्रवार दि २२ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे . या शताब्दी सोहळ्याचे शानदार उद्घाटन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कन्या शाळा शाला समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली .

यावेळी शाला समिती उपाध्यक्ष केदार शालगर, कन्या शाळा प्राचार्य, कविता जगताप, उपप्राचार्य हणमंत भांडवलकर बीसीए कॉलेज प्राचार्य व संस्थेच्या आजन्म सेविका समीक्षा निकम, पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे, पर्यवेक्षक लक्ष्मण एकळ , प्रसिद्धी विभाग प्रमुख सुप्रिया चव्हाण यावेळी उपस्थित होते .

थोरात पुढे म्हणाले, महषी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर १९२२ रोजी साताऱ्यात सात विद्यार्थीनींवर कन्या शाळा परांजपे वाडा येथे सुरू झाली .धोंडो कर्वे यांच्या आग्रहानुसार कमलाबाई देशपांडे यांनी अध्ययनाचे काम स्वीकारले . साताऱ्यातील तत्कालीन नामवंत वकिल कै रावबहाद्दर काळे यांनी आपल्या पत्नी सत्यभामाबाई काळे यांच्या स्मरणार्थ राहता वाडा कन्या शाळेला दिला . संस्थेच्या माध्यमातून कन्या शाळेच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक , तंत्रशिक्षण तसेच संगणक व व्यवसाय शिक्षण विभागाच्या कार्याचा आणि विस्ताराचा आढावा त्यांनी घेतला .

कन्या शाळेच्या प्राचार्य कविता जगताप म्हणाल्या येत्या २२ ऑक्टोबर रोजी कन्या शाळा सातारा शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे . या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष रविंद्र देव, उपाध्यक्ष विद्या कुलकर्णी व सचिव पी व्ही एस शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . शताब्दी शुभारंभाचा मुख्य कार्यक्रम कन्या शाळेच्या प्रांगणात शुक्रवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह संस्थेच्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे . शताब्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुणे येथील महर्षी कर्वे यांच्या स्मारकापासून एक क्रीडा ज्योत आणण्यात येणार आहे . दुपारी ४ वाजता पोवई नाक्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शाळेचे खेळाडू ही ज्योत कन्या शाळेच्या प्रांगणात पोहचविणार आहेत, अशी माहिती शाळा पर्यवेक्षक चंद्रकांत ढाणे यांनी दिली

Web Title: Sataras kanya school on the verge of centenary year nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2021 | 06:57 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.