अभिनेत्री शिल्पा तुळसकर ब-याच कालावधीतनंतर मराठी स्मॉल स्क्रीनवर कमबॅक करते आहे. इतक्या वर्षांच्या गॅपनंतर परत मराठीत काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली की, मराठी क्षेत्रात काम करणं हा माझ्यासाठी माहेरी आल्यासारखा अनुभव आहे. मात्र आपण सारखं माहेरी येऊ शकत नाही, त्यानं मान कमी होतो.
करिअरच्या सुरुवातीपासून सुदैवाने माझ्या वाट्याला नेहमीच चांगल्या भूमिका आल्या. टीव्ही माध्यमावर मी नेहमीच प्रेम केलं. अनेक मालिकेतून मी शिकत गेले. घर-करिअर यात समतोल साधत आज नवी मालिका तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे याचा आनंद आहे. ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतील ‘पुष्पवल्ली’ आपल्याला कधीतरी भेटलेली असते, म्हणून ती साकारताना इंटरेस्टिंग वाट आहे.