जीएसटी दरकपात हा सर्वसामान्य माणसाच्या समृद्धीचा महामार्ग - निरंजन डावखरे
केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर (GST) दरकपातीचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या 22 सप्टेंबरपासून ही सुधारणा लागू होणार असून, यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास भाजप आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लालकिल्ल्यावरून केलेला ‘सामान्य माणसाच्या सुखी आणि संपन्न जीवनाचा संकल्प’ आता प्रत्यक्षात उतरत आहे. केंद्र सरकारने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी करसुधारणा असून, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ मिळेल, रोजगार निर्मिती वाढेल आणि कुटुंबांची आर्थिक प्रगती अधिक वेगाने होईल.
दिलासादायक! अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बाधितांना ७३ कोटी ९१ लाखांची मदत; राज्य शासनाची मान्यता
जीएसटी परिषदेने एकमताने मंजूर केलेल्या नव्या रचनेनुसार, सध्याच्या चार स्तरीय कर पद्धतीत बदल करून आता फक्त 18% आणि 5% अशा दोन स्तरांमध्ये कर आकारणी होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंवरील कराचा बोजा मोठ्या प्रमाणावर हलका किंवा नाहीसा होणार आहे.
डावखरे म्हणाले, “शेतकरी, लघु व मध्यम उद्योग, मध्यमवर्गीय, महिला आणि युवक या सर्व घटकांना या सुधारणांचा थेट लाभ मिळणार आहे. व्यावसायिकांना व्यवसाय सुलभतेचा अपूर्व आनंद मिळेल आणि समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंतचा प्रत्येक नागरिक समृद्धीच्या प्रवासात सहभागी होईल.”
Shivsena : “…संजय राऊत यांच्यावर कारवाई करा”, शिवसेनेच्या शिष्टमंडळाची मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणी
त्यांनी पुढे सांगितले की, स्वातंत्र्यानंतर तब्बल 67 वर्षे (1947-2014) देशाची आर्थिक वाटचाल संथ राहिली होती. त्या काळात राष्ट्रीय उत्पन्न फक्त 2.04 ट्रिलियन डॉलर्स पर्यंतच पोहोचले होते. मात्र 2014 नंतर मोदी सरकारने धोरणात्मक सुधारणा राबवून आत्मनिर्भर भारताची पायाभरणी केली. 1 जुलै 2017 रोजी सुरू झालेल्या जीएसटी करप्रणालीमुळे गेल्या काही वर्षांत देशातील 25 कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली, आणि भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर पोहोचली. जागतिक वित्तसंस्थांच्या मते, लवकरच भारत तिसऱ्या क्रमांकावर झेपावणार आहे.
राज्यात कोणतेही सरकार असले तरी जीएसटी दरकपातीमुळे प्रत्येक नागरिक, व्यापारी, उद्योजक, शेतकरी आणि मध्यमवर्गीयांना थेट फायदा होणार आहे. “काँग्रेस पक्षाला प्रत्येक विषयाला राजकीय रंग देण्याची सवय लागली आहे. मात्र मोदी सरकार सर्वसामान्यांचे भले करण्यासाठी आणि देशाच्या विकासासाठीच राजकारण करत राहील,” असे डावखरे म्हणाले.