उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा प्रकल्पग्रस्तांना दिलासा (फोटो- सोशल मीडिया)
रहिवाशांचे पुनर्वसन होणार
बाधित इमारतीतील ८३ प्रकल्पग्रस्तांना दिलासा
एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार
मुंबई: येथील शिवडी-वरळी उन्नत मार्गामधील एलफिस्टन ब्रिज परिसरातील बाधित दोन इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केला आहे. लक्ष्मी निवास व हाजी नुरानी चाळ या बाधीत इमारतींमधील एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव मान्य केल्यामुळे बाधीत इमारतींमधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
वरळी-शिवडी कनेक्टर उभारणीसाठी एलफिस्टन ब्रिज पाडण्यात येणार असून पिलर उभारणी करताना लक्ष्मी निवास आणि हाजी नुरानी चाळ या दोन इमारती बाधीत होणार आहे. या दोन इमारतींमधील रहिवाशी प्रकल्पग्रस्तांची त्याच परिसरात म्हाडाकडे उपलब्ध असलेल्या सदनिकांमध्ये पुनर्वसनाची मागणी होती. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडामधील आजूबाजूच्या परिसरातील सदनिकांमध्ये पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे. लक्ष्मी निवास इमारतीमधील ६० प्रकल्पग्रस्त आणि हाजी नुरानी चाळमधील २३ प्रकल्पग्रस्त अशा एकूण ८३ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आता त्याच परिसरात होणार आहे.
MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर, या भागात मिळेल तुमच्या स्वप्नातील घर
यापूर्वी या प्रकल्पासाठी एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या पण MMRDAने रचनात्मक बदल करून १७ इमारती प्रकल्पाच्या मार्गामुळे बाधित होणार नाही याची काळजी घेतली आणि मार्ग बदलला , ज्यामुळे केवळ रहिवाशांचे पुनर्वसन सुलभ झाले नाही तर सुमारे पुनर्वसनावर होणारा ५२०० कोटी रुपयांचा खर्च वाचवला. तसेच, या निर्णयामुळे प्रकल्पाची गती वाढून तो निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकेल.
पुनर्वसनाचे निकष : 300 चौ.फु. पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या घरमालकांना – 300 चौ.फु. + 35% अतिरिक्त क्षेत्र = एकूण 405 चौ.फु. क्षेत्राची सदनिका देण्यात येणार. 300 ते 1292 चौ.फु. क्षेत्रामधील घरमालकांना – विद्यमान क्षेत्र + 35% अतिरिक्त क्षेत्रफळ प्रमाणे नवे घर दिले जाणार.
MHADA ची बंपर लॉटरी, फक्त १५ लाखांमध्ये मिळवा घर
स्वत: चे आणि हक्काचे घर असावं असं प्रत्येकाच स्वप्न असते. आता तुमचं हेच स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली आहे. म्हाडाकडून बंपर लॉटरी काढण्यात आली आहे. म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) कोकण मंडळाने घराच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आणली आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) नाशिक मंडळाने नाशिक शहरी भागातील विविध निवासी प्रकल्पांतर्गत ४७८ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेचे उद्घाटन म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी मुंबईतील म्हाडाच्या मुख्यालयातून ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत केले.