अहिल्यानगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले की कुणालाही चुकीचे किंवा खोटे कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही. मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की व्हेरिफिकेशनशिवाय प्रमाणपत्र दिले जाणार नाही, हे मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केले आहे. ओबीसी बांधवांचा गैरसमज दूर करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, कर्नाटकातील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याच्या वादावर विखे पाटील यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत असून, त्यांचे नाव बदलण्याचे पाप काँग्रेस करणार असेल, तर जनता कधीही त्यांना माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.