शिवानी-अंबरच्या लग्नपत्रिकेची पहिली झलक, लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
गेल्या काही दिवसांपासून मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये लगीनघाई सुरु असल्याचं पाहायलं मिळत आहे. अनेक सेलिब्रिटी सध्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. आता अशातच आणखी एक टेलिव्हिजन सेलिब्रिटी कपल लग्नबंधनात अडकणार आहे. ‘राजा राणीची गं जोडी’ फेम शिवानी सोनार आणि ‘रंग माझा वेगळा’ फेम अंबर गणपुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी लगीनघाई सुरु असून नुकतंच त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे.
एकाच दिवशी रिलीज झालेल्या ‘इमर्जन्सी’ आणि ‘आझाद’ची बॉक्स ऑफिसवर परिस्थिती काय ? वाचा सविस्तर…
शिवानी आणि अंबरचं येत्या २१ नोव्हेंबरला लग्न असून नुकतंच त्यांच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झालेली आहे. नुकतंच या कपलचा मेहेंदीचा सोहळा पार पडला असून सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मेहंदी सोहळ्यामध्ये शिवानी आणि अंबर दोघंही एकत्र होते. दोघांनीही आपआपल्या इन्स्टा स्टोरीवर मेहेंदीतले फोटोंची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. खरंतर शिवानी आणि अंबरने मेहंदी फंक्शनमधले फोटो पोस्ट केलेले नाहीत त्यांच्या लग्नातले फोटोशूट करण्यासाठी आलेल्या फोटोग्राफरच्या इन्स्टा पेजवर लग्नाच्या फोटोंची चाहत्यांना झलक पाहायला मिळणार आहे.
मेहेंदीच्या कार्यक्रमात दोघंही रेड कलरचे ड्रेस वेअर करुन होते. दोघांनीही म्युझिकवर जबरदस्त डान्स करत चाहत्यांचे लक्ष वेधले. दरम्यान, अंबर आणि शिवानीने त्यांच्या लग्नपत्रिकेचीही पहिली झलक इन्स्टाग्रामवर शेअर केलेली आहे. यावर शिवानी आणि अंबर या दोघांच्या नावाची फोड करून ‘#Ambani’ हा हॅशटॅग सुद्धा वापरण्यात आला आहे. “लगीनघटिका समीप आली करा हो लगीनघाई…” असं कॅप्शन देत त्यांनी लग्नातले फोटो शेअर केले. शिवानी आणि अंबर हे दोघंही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. आजवर दोघांनीही अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, २०२४ मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंबर आणि शिवानीने साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यानंतर चाहते या दोघांच्या लग्नसोहळ्याची आतुरतेने वाट पाहत होते. आता येत्या अवघ्या काही दिवसांतच ही जोडी विवाहबंधनात अडकणार आहे. अंबर-शिवानीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अंबरने आतापर्यंत स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘कलर्स मराठी’ची मालिका ‘दुर्वा’ यामध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर, शिवानी कलर्स मराठीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ आणि सोनी टेलिव्हिजन मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’अशा मालिकांमध्ये झळकली आहे.