एकाच दिवशी रिलीज झालेल्या 'इमर्जन्सी' आणि 'आझाद'ची बॉक्स ऑफिसवर परिस्थिती काय ? वाचा सविस्तर…
फार मोठ्या प्रतिक्षेनंतर अखेर कंगना रणौतचा ‘इमर्जन्सी’ चित्रपट रिलीज झाला आहे. १७ जानेवारीला कंगना रणौतचा हा चित्रपट देशभरासह जगभरात रिलीज झाला आहे. या चित्रपटासोबत राशा थडानी आणि अमन देवगणचा ‘आझाद’ चित्रपटही रिलीज झाला आहे. या दोन्हीही चित्रपटामध्ये कमाईच्या बाबतीत ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. दोन्हीही चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहे. दोन्ही चित्रपटांच्या पहिल्या विकेंड दरम्यानची अर्थात दुसऱ्या दिवसाची कमाई जाणून घेऊया…
कंगना रणौत अभिनित आणि दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’ चित्रपट १७ जानेवारीला रिलीज झाला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजेच, प्रदर्शनाच्या दिवशी जेमतेम २.५० कोटींचीच कमाई केलेली आहे. तर शनिवारी अर्थात दुसऱ्या दिवशी ३.५० कोटींची कमाई केलेली आहे. याचाच अर्थ कंगनाच्या चित्रपटाला विकेंडला सकारात्मक प्रतिसाद मिळालेल्याचं दिसत आहे. चित्रपटाने दोन दिवसांत ६ कोटींची कमाई केली असून चित्रपट पहिल्या विकेंडला म्हणजेच तिसऱ्या दिवशी रविवारचा कमाईचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
राशा थडानी आणि अमन देवगन यांनी ‘आझाद’ चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये डेब्यू केले आहे. अजय देवगणही या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. मात्र, त्याचे स्टारडमही चित्रपटाला चांगली ओपनिंग देऊ शकले नाही. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त १ कोटी ५० लाखांचीच कमाई केली आहे. तर, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने पहिल्या 4k दिवसाप्रमाणेच कमाई केली आहे. चित्रपटाच्या कमाईत कोणतीही सुधारणा झाली नसून चित्रपटाची एकूण कमाई ३ कोटींवर पोहोचली आहे. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा थडानीचा आणि अभिनेता अजय देवगणचा पुतण्या अमन देवगणचाही हा पहिला चित्रपट आहे.
सैफ अली खानच्या हल्लेखोराला मुंबई पोलिसांनी अखेर ठाण्यातून घेतलं ताब्यात, चौकशी सुरू
राम चरण स्टारर चित्रपटाचे नाव ‘गेम चेंजर’ असून चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. चित्रपट रिलीज होऊन जवळपास ९ ते १० दिवस झाले आहेत. चित्रपटाने इतक्या दिवसांत जेमतेम १२३. ५ कोटींचीच कमाई केलेली आहे. २०२५ मधील बिग बजेट चित्रपटांच्या यादीत रामचरणच्याही ‘गेम चेंजर’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. चित्रपटाने फार मुश्किलीने १०० कोटींचा टप्पा गाठला आहे. दरम्यान, चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे. नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने फक्त २ कोटी ६५ लाखांची कमाई केली.
जानेवारी महिन्यात आतापर्यंत अनेक चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाले आहेत, परंतु यापैकी एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही. ‘गेम चेंजर’, ‘फतेह’ नंतर आता ‘आझाद’ आणि इमरजन्सी’ हे चित्रपटही लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत.