Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena dasra Melava budget : “63 कोटी लागणार आहेत म्हणे….! ठाकरेंच्या दसऱ्याचा मेळाव्याचा भाजपने थेट मांडला हिशोब

Shivsena dasra Melava 2025 : दसऱ्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. याच्या बजेटवरुन भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार निशाणा साधला असून टीका केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 01, 2025 | 01:12 PM
Shivsena Thackeray group Shivtirth dasra melava 2025 budget 63 crore Keshav Upadhyay criticizes

Shivsena Thackeray group Shivtirth dasra melava 2025 budget 63 crore Keshav Upadhyay criticizes

Follow Us
Close
Follow Us:

Shivsena dasra Melava budget : मुंबई : नवरात्रौत्सावाची सांगता होणार असून दसरा सणाची तयारी सुरु झाली आहे. विजयादशमीसाठी राजकीय वर्तुळामध्ये जोरदार तयारी केली जाते. दसऱ्याच्या निमित्ताने अनेक राजकीय नेते हे मेळावे घेत असतात. यामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा हा जोरदार चर्चेत असतो. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून शिवसेनेचा शिवतीर्थावर शिवसैनिकांना विचारांचे सोने लुटले जाते. मात्र आता ठाकरे गटाच्या मेळाव्याच्या बजेटची जोरदार चर्चा रंगली आहे.

राज्यामध्ये तुफान पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना अर्थिक मदत करण्याचे आवाहन केले जात आहे. ठाकरे गटाने त्यांच्या दसरा मेळावा रद्द करुन ते पैसे शेतकऱ्यांना द्यावे असा टोला देखील भाजपने यापूर्वी ठाकरे गटाला लगावला होता. यानंतर आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन शिवसेना ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याच्या बजेटचा आकडा सांगितला आहे. याबाबत त्यांनी एक्सवर पोस्ट लिहून धक्कादायक आकडा सांगितला.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत ठाकरे गटाच्या मेळाव्याबाबत मोठा दावा केला. उपाध्ये यांनी लिहिले आहे की,  ६३ कोटीचा दसरा मेळावा. नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती!!

६३ कोटीचा दसरा मेळावा नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची… — Keshav Upadhye (@keshavupadhye) October 1, 2025

मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले. सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था……. असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे. या ६३ कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती?

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा!! नाकी नऊ आले म्हणतात ते हेच!! रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा, असा घणाघाती टोला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

Web Title: Shivsena thackeray group shivtirth dasra melava 2025 budget 63 crore keshav upadhyay criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • shivsena

संबंधित बातम्या

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
1

Mumbai: उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र Tejas Thackeray रुग्णालयात दाखल; रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली
2

छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 पैकी 11 जागांवर महिलांनी मारली बाजी; भाजपची ताकद वाढली

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
3

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल
4

Shambhuraj Desai News: आमची भूमिका ठरवणारा भाजप कोण? महायुतीत ठिणगी, शंभूराजे देसाईंनी सुनावले खडे बोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.