Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 12 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena Merger : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? ओमराजेंचं मोठं विधान, भरत गोगावलेंनीही दिले संकेत!

Shivsena Merger : महाराष्ट्राच्या राजकारणात आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंद होईल, असं म्हटलं आहे. तर मंत्री भरत गोगावले यांनीही राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, असं सूचक विधान केलं.

  • By विवेक
Updated On: Nov 12, 2026 | 05:57 PM
 Eknath Shinde on uddhav thackeray

 Eknath Shinde on uddhav thackeray

Follow Us
Follow Us:
  • दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार?
  • ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
  • राजकारणात काहीही घडू शकतं – भरत गोगावले
 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा रंगत असतानाच आता शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विधानानंतर या चर्चेला आणखी हवा मिळाली असून मंत्री भरत गोगावले यांनीही सूचक प्रतिक्रिया दिली आहे. (Shivsena Merger)

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कुणी नसेल, असं त्यांनी म्हटलं आहे.

दोन्ही पक्षांचे प्रमुख वेगवेगळे आहेत. त्यामुळे एकत्र येण्याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाच घ्यावा लागेल. मात्र, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, ही कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेचीही भावना असल्याचं ओमराजे यांनी सांगितलं.

NCP Merger News: अजित पवार महायुतीची साथ सोडणार होते; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच ओमराजे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात विशेष चर्चा होत आहे.

भरत गोगावलेंचं सूचक विधान

दुसरीकडे, मंत्री भरत गोगावले यांनाही दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर सध्याच्या परिस्थितीत आम्हाला असं काही घडेल, असं वाटत नाही. मात्र, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही. सकाळचं संध्याकाळी आणि संध्याकाळचं सकाळी होऊ शकतं, असं ते म्हणाले.

गुलाबराव पाटील यांना याबाबत काही माहिती मिळाली असेल, तर येत्या मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत त्यांनाच विचारणार असल्याचंही गोगावले यांनी सांगितलं.

गुलाबराव पाटलांचं रेल्वेचं उदाहरण चर्चेत!

याआधी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चेवर रेल्वेचं उदाहरण दिलं होतं. ‘एकनाथ शिंदे आमचं इंजिन आहेत आणि आम्ही रेल्वेचे डबे आहोत. इंजिन जिकडे जाईल, तिकडे डबे जातील,’ असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयालाच महत्त्व असल्याचं स्पष्ट केलं होतं.

एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा आणि दुसरीकडे शिवसेनेच्या एकत्रीकरणाबाबत नेत्यांची विधानं, यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही शिवसेना प्रत्यक्षात एकत्र येणार का, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sanjay Raut: सुनेत्रा पवार गटाला मोठा धक्का बसणार? 22 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत; संजय राऊतांचा मोठा दावा

💡

Frequently Asked Questions

  • Que: दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

    Ans: दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर माझ्यापेक्षा जास्त आनंदी माणूस दुसरा कुणी नसेल, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं.

  • Que: भरत गोगावले यांनी शिवसेना एकत्रीकरणाबाबत काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: सध्याच्या परिस्थितीत दोन्ही शिवसेना एकत्र येतील असं वाटत नाही. मात्र, राजकारणात कधीही काहीही घडू शकतं, असं भरत गोगावले म्हणाले.

  • Que: गुलाबराव पाटील यांनी दोन्ही शिवसेनांच्या एकत्रीकरणाबाबत काय म्हटलं?

    Ans: गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची तुलना रेल्वेच्या इंजिनाशी केली. एकनाथ शिंदे आमचं इंजिन आहेत आणि आम्ही रेल्वेचे डबे आहोत. इंजिन जिकडे जाईल, तिकडे डबे जातील, असं त्यांनी म्हटलं.

Web Title: Shinde thackeray shivsena merger omraje nimbalkar bharat gogawale statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • Bharat Gogawale
  • Mp Omraje Nimbalkar
  • shivsena
  • Shivsena UBT

संबंधित बातम्या

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या
1

Mumbai News : रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ! ‘युपी, बिहारमध्ये अशी गाणी लावणार का?’ म्हणत किशोरी पेडणेकर संतापल्या

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!
2

Crime News: “शाखाप्रमुख पद मिळवून दिलं म्हणून थेट खल्लास?” मध्यरात्री थरार; नगरसेवकाच्या पुतण्याने पाठीत खुपसला चाकू!

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ
3

Maharashtra Politics: गटनेतेपद शिवसेनेकडे, मात्र नगराध्यक्षांचंच नाव गायब; शेवगावच्या राजकारणात खळबळ

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण
4

Shivsena Merger : शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ओमराजे निंबाळकरांनी थेट सांगितलं, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.