(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हीने नुकताच करवाचौथच्या दिवशी आपल्या पती झहीर इकबालसोबत अबू धाबीच्या प्रसिद्ध शेख जायद ग्रँड मशिदीला भेट दिली. या भेटीचे काही सुंदर फोटो सोनाक्षीने सोशल मीडियावर शेअर केले. पण, काही नेटकऱ्यांनी या फोटोंमध्ये दोघांना बूट घातलेले दिसत असल्यामुळे तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
सोनाक्षीने आपल्या पोस्टमध्ये दिलेल्या फोटोमध्ये ती आणि झहीर जास्तीत जास्त वेळ मशिदीच्या बाहेरच आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांना मशिदीमध्ये बूट घालून प्रवेश केल्याचा आरोप केला. सोनाक्षीने उत्तर दिले, “म्हणूनच मी माझे बूट घालून आत गेले नाही. नीट पहा, आम्ही मशिदीबाहेर आहोत. आम्ही आत जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला आमचे बूट कुठे ठेवायचे ते दाखवले आणि आम्ही ते काढले. मला तेवढे माहिती आहे. सोनाक्षीने फोटो शेअर केले आणि लिहिले, “मला अबू धाबीमध्ये शांती मिळाली आहे.”
सोनाक्षीच्या या स्पष्टीकरणानंतर नेटकऱ्यांनी काहीसे शांतता राखली आहे. यापूर्वीही रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी अशाच शेख जायद ग्रँड मशिदीमध्ये हिजाब घातलेला एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यावर दीपिकाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
Bobby Deol: बॉबी देओलचे ‘ते’ विधान चर्चेत; म्हणाला, “धर्मेंद्र सध्या आई….”
सोनाक्षी सिन्हाने करवाचौथच्या निमित्ताने अबू धाबी येथील शेख जायद ग्रँड मशिदीमधून काही फोटो शेअर केले, त्यानंतर सोशल मीडियावर काही युजर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. काहींनी कमेंट करून तिच्या या कृतीवर नाराजी व्यक्त केली. मात्र, या ट्रोलिंगला काही चाहत्यांनी तिच्या बाजूने कमेंट्स देखील केल्या आहेत.
सोनाक्षी सिन्हाने तिच्या पती झहीर इकबालशी आंतरधर्मीय विवाह केल्यानंतर अनेकदा सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि टीकेचा सामना केला आहे. परंतु एका मुलाखतीत सोनाक्षीने स्पष्ट केले की, त्यांच्या नात्यात कधीही धर्मामुळे कोणतीही अडचण आली नाही.सोनाक्षीने गेल्या वर्षी जूनमध्ये झहीरशी लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या घरी लग्नाची नोंदणी केली. लग्नाला फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तथापि, नंतर त्यांनी सर्व बॉलिवूड स्टार्सच्या उपस्थितीत एक रिसेप्शन पार्टी आयोजित केली.