Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जिल्हा परिषदेतून नोकरभरती प्रकरणाची फाईलच गायब; सुमारे ६८७ जणांची नोकरभरती बेकायदा

  • By युवराज भगत
Updated On: Aug 02, 2023 | 08:15 PM
जिल्हा परिषदेतून नोकरभरती प्रकरणाची फाईलच गायब; सुमारे ६८७ जणांची नोकरभरती बेकायदा
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महापालिकेत समाविष्ट गावांमधील नोकरभरतीचा मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषदेतून नोकरभरती प्रकरणाची फाईलच गायब झाली आहे. ही फाईल गेली कुठे, याचा शोध घेण्यासाठी ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना सांगितले होते. मात्र, त्यांची शासनाने बदली केली आहे.

पुणे महापालिकेत  २३ गावांपैकी १७ गावे समाविष्ट

पुणे महापालिकेत  २३ गावांपैकी १७ गावांमध्ये झालेल्या नोकरभरती प्रकरणी जिल्हा परिषदेने तपास केला होता. या गावातील सुमारे ६८७  जणांच्या नोकरभरती ही बेकायदा ठरविल्याचा अहवाल मुंडे समितीने दिला होता. या संदर्भात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करण्यासाठी लाच लुचपत विभागाकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामविकास विभागाकडे पाठविला होता.

फाईल गहाळ झाल्याने प्रकरणाची चर्चा सुरू
दरम्यान, विभागीय आयुक्तालयातून या संदर्भात चौकशी होऊन या प्रकरणातील दोषींना क्लिन चिट दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, या प्रकरणात अर्थपूर्ण घडामोडी झाल्याची बाब दबक्या आवाजात चर्चेला आली. आता या प्रकरणाची चर्चा थांबली असतानाच फाईल गहाळ झाल्याने प्रकरणाची चर्चा सुरू झाली. जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात ग्रामपंचायत नोकर भरतीची फाईल होती. मात्र, काही दिवसांपूर्वीपर्यंत या प्रकरणाची फाईल विभागातील कर्मचार्‍यांकडे ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर या प्रकरणाची फाईल गायब झाल्याची तक्रार काही संघटनांनी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे केली होती.
या प्रकरणाच्या फाईलचा शोध घेण्याची सूचना
त्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी पंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे यांना या प्रकरणाच्या फाईलचा शोध घेण्याची सूचना केली होती. दरम्यान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी घाडगे यांची बदली झाल्याने या प्रकरणाच्या फाईलचा शोध ठप्प झाला.

Web Title: The file of recruitment case is missing from zilla parishad illegal recruitment of about 687 people nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2023 | 08:13 PM

Topics:  

  • Pune Municipal Corporation
  • Pune Zilla Parishad

संबंधित बातम्या

Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट
1

Mulshi Gram Panchayat Election 2026: निवडणुका लांबणीवर पडल्याने मुळशीतील ४२ ग्रामपंचायतींवर प्रशासकीय राजवट

Pune ZP Election News:  जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?
2

Pune ZP Election News: जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी लॉबिंगला वेग; तालुक्याचा मान की पुढील विधानसभा समीकरणे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.