Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे’ ३ खेळाडू आयपीएलमध्ये ठरले सर्वाधिक फ्लॉप, या यादीत भारताच्या एका कर्णधाराचाही आहे समावेश

देश-विदेशातील अनेक मोठे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. पण या लीगमध्ये भारताचे अनेक दिग्गज खेळाडूही फ्लॉप ठरले आहेत. या खेळाडूंनी भारतासाठी चांगली कामगिरी केली आहे, या यादीत भारताच्या एका माजी कर्णधाराचाही समावेश आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Mar 21, 2022 | 11:39 AM
‘हे’ ३ खेळाडू आयपीएलमध्ये ठरले सर्वाधिक फ्लॉप, या यादीत भारताच्या एका कर्णधाराचाही आहे समावेश
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली : आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे, या लीगमध्ये जगातील दिग्गज खेळाडू खेळतात. आयपीएलने भारताला अनेक युवा खेळाडू दिले आहेत ज्यांनी भारतासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. IPL ची सुरुवात 2008 साली झाली. यावेळी आयपीएलचा १५वा मोसम खेळला जाणार आहे. यावेळीही सर्व चाहत्यांच्या नजरा युवा खेळाडूंवर खिळल्या आहेत.

पण ही अशी लीग आहे जिथे दिग्गज फलंदाजही चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. आज आम्ही तुम्हाला भारताच्या अशा 3 महान खेळाडूंबद्दल सांगणार आहोत ज्यांनी भारतासाठी खूप काही केले आहे परंतु हे फलंदाज IPL मध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत.

चेतेश्वर पुजारा

भारतीय क्रिकेटमधील कसोटी संघाची भिंत मानल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने भारतासाठी अनेक महत्त्वाच्या आणि मोठ्या खेळी खेळल्या आहेत, मात्र पुजाराला आयपीएलमध्ये कधीही यश मिळू शकले नाही. पुजाराला आयपीएलमध्ये जास्त खेळण्याची संधीही मिळालेली नाही. पुजाराने आयपीएलमध्ये केवळ ३० सामने खेळले आहेत. पुजारा या सामन्यांमध्येही फ्लॉप ठरला आहे, पुजाराच्या नावावर आयपीएलमध्ये अवघ्या 20.52 च्या सरासरीने 390 धावा आहेत.
आयपीएलमध्ये पुजाराने 99.74 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत, जे टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने खूपच कमी आहे. आयपीएल 2021 साठी चेन्नई सुपर किंग्जमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता परंतु पुजारा आयपीएल 2022 मध्ये कोणत्याही संघाचा भाग नाही.

सौरव गांगुली

भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये सौरव गांगुलीचे नाव येते पण सौरव गांगुली आयपीएलमध्ये फ्लॉप ठरला. गांगुली आयपीएलमध्ये कर्णधार आणि फलंदाज म्हणून अपयशी ठरला होता. गांगुलीने आयपीएलमध्ये एकूण 59 सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावावर 25.45 च्या सरासरीने 1349 धावा आहेत.

गांगुलीचा स्ट्राइक रेटही फक्त 106.81 होता आणि त्याने फक्त 7 अर्धशतके केली होती. कर्णधार असतानाही गांगुलीने 42 सामन्यांपैकी 17 सामने जिंकले होते आणि 25 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. सौरव गांगुलीच्या नावानुसार ही कामगिरी जबरदस्त म्हणता येणार नाही.

वसीम जाफर

वसीम जाफर हे भारतीय क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. जाफर हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये भारतातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे पण जाफरला आयपीएलमध्ये कधीही यश मिळाले नाही. वसीम जाफरला आयपीएलमध्ये केवळ 8 सामने खेळण्याची संधी मिळाली. या 8 सामन्यात जाफरने केवळ 130 धावा केल्या होत्या. जाफरचा स्ट्राईक रेट देखील केवळ 107.44 होता, ज्यामुळे त्याला आयपीएलमध्ये पुढे खेळण्याची संधी मिळाली नाही. या 8 सामन्यात जाफरच्या बॅटने केवळ 14 चौकार आणि 3 षटकार मारले आणि 1 अर्धशतक झळकावले.

Web Title: These 3 players are the most flops in the ipl the list also includes an indian captain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2022 | 11:39 AM

Topics:  

  • Cheteshwar Pujara
  • cricket
  • Sourav Ganguly
  • Wasim Jaffer

संबंधित बातम्या

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?
1

IND W vs PAK W Live Streaming : भारत पाकिस्तान यांच्यात होणार लढत! 11 वेळाचा ‘शून्य’चा कलंक पुसून टाकेल का पाक?

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव
2

IND vs WI highlight : भारताच्या संघाने वेस्ट इंडिजला चारली धूळ! WI चा पहिल्या सामन्यात 140 धावांनी केला पराभव

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?
3

IND vs WI : फ्लाईंग नितीश कुमार रेड्डी… हवेत उडून घेतला झेल तुम्ही पाहिला का हा Video?

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता
4

IND vs WI 3rd Day : दुसऱ्या इनिंगमध्ये वेस्टइंडीजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये! जडेजाने तीन फलंदाजांना दाखवला बाहेरचा रस्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.