अवघ्या 12 दिवसांतच मोडले 'या' अभिनेत्रीचे लग्न; हनिमूनवरून पतीला पाठवले तुरुंगात
आम्ही ज्या अभिनेत्रींविषयी बोलत आहोत तिचे नाव आहे पूनम पांडे. वाद आणि पूनम पांडेचं एक वेगळं नातं आहे. कुठेही वाद असला तरी लोकांना पूनम पांडेची आठवण नक्कीच येते. पूनमने 2013 मध्ये त्याने 'नशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर अभिनेत्री खतरों के खिलाडी 4, लॉक अप अशा अनेक रिॲलिटी शोमध्ये दिसून आली
अभिनेत्री पूनम पांडेची लव्ह लाईफ टीव्ही ड्रामापेक्षा काही कमी नाही. अभिनेत्रीने सॅम बॉम्बेला सुमारे 3 वर्षे डेट केले. बॉम्बे लाइमलाइटमध्ये सॅम जरा कमी राहतो, पण इंडस्ट्रीत त्याची एक वेगळी ओळख आहे. सॅम हा प्रसिद्ध ॲड फिल्ममेकर आहे
सॅम बॉम्बेने दीपिका पदुकोण, तमन्ना भाटिया यांसारख्या अनेक मोठ्या सेलिब्रिटींसोबत जाहिराती शूट केल्या आहेत. एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान सॅम आणि पूनम यांची भेटही झाल्याचे बोलले जात आहे. या दोघांचे नाते अगदी गुपित होते. दोघांनी 2020 मध्ये गुपचूप लग्न केले. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही
लग्नानंतर पूनम आणि सॅम लॉस एंजेलिस हनीमूनला गेले होते. तेथून परतल्यानंतर दोघेही गोव्याला रवाना झाले. पूनम तिच्या एका चित्रपटाचे शूटिंग गोव्यात करणार होती. ही सहल त्यांच्या नात्याचा शेवट करणारी ठरली. त्यांच्या लग्नाला फक्त 12 दिवस झाले असतानाच त्यांचे नाते तुटले. अभिनेत्रीने आपल्या पतीला गोव्यातच तुरुंगात पाठवले
अभिनेत्रीने पतीवर मारहाण आणि तिचे शोषण केल्याचे गंभीर आरोप केले होते, त्यानंतर सॅमला तुरुंगात जावे लागले होते. त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पूनम पांडेने ही बाब लॉकअप शो दरम्यान उघड केली