Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हातात तलवार अन् रक्तात माखलेला चेहरा…’ ‘द ब्लफ’ मधील प्रियांका चोप्राचा लूक व्हायरल, चाहत्यांची वाढली उत्सुकता

प्रियांका चोप्राचा आगामी हॉलिवूड चित्रपट "द ब्लफ" सध्या चर्चेत आहे. अभिनेत्रीने या चित्रपटातील तिचे लूक इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर पाहून चाहते चकीत झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 08, 2026 | 10:03 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘द ब्लफ’ मधील प्रियांका चोप्राचा लूक व्हायरल
  • ‘द ब्लफ’ मध्ये अभिनेत्रीची अनोखी भूमिका
  • ‘द ब्लफ’ मधील लूक पाहून चाहते चित्रपटासाठी उत्सुक
 

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा सध्या बॉलीवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही इंडस्ट्रीमध्ये काम करून चाहत्यांना प्रभावित करत आहे. तिच्या आगामी हॉलिवूड “द ब्लफ” चित्रपटासाठी ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. ती कार्ल अर्बनसोबत या चित्रपटामध्ये ॲक्शन भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्रीने नुकतेच इन्स्टाग्रामवर “द ब्लफ” मधील तिच्या लूकचे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती पूर्ण ॲक्शन मोडमध्ये दिसत आहे. हा चित्रपट १८०० च्या दशकात घडणार आहे. प्रियांका चोप्राचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि तिच्या लूकमुळे चाहत्यांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Bhooth Bangla: ५ महिन्यानंतर उघडणार भूत बंगल्याचा दरवाजा, अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र करणार कल्ला

चित्रपटातील अभिनेत्रीचा लूक व्हायरल

प्रियांका चोप्राने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एर्सेल बोडेनची भूमिका साकारत आहे. हे पात्र “ब्लड मेरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समुद्री रक्षकापासून प्रेरित आहे. फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा देखील समुद्री रक्षकाच्या लूकमध्ये दिसत आहे. हातात तलवार आणि विस्कटलेले केस असलेली प्रियांका खूप क्लासी अंदाजात दिसते आहे. दुसऱ्या फोटोमध्ये, अभिनेत्री रक्ताने माखलेली आहे आणि हातात बंदूक धरलेली दिसत आहे. इतर फोटोंमध्ये समुद्रकिनारा आणि चित्रपटाचे दिग्दर्शक फ्रँक ई. फ्लॉवर्स दिसत आहेत.

 

हा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

प्रियांका चोप्राचा चित्रपट २५ फेब्रुवारी रोजी प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना समुद्री रक्षकाचे एक साहस अनुभवायला मिळणार आहे, ज्यामध्ये समुद्री रक्षकाची काळी आणि अ‍ॅक्शनने भरलेली बाजू दाखवली जाणार आहे. “द ब्लफ” हा चित्रपट “ब्लड मेरी” च्या जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. ती तिचा हिंसक भूतकाळ मागे सोडून आव्हानांना तोंड देत तिचे नवीन जीवन कसे सुरू करते हे सगळं यामध्ये दाखवण्यात आले आहे. अभिनेत्रीच्या खास लूकनेही प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. चाहते या मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट

“द ब्लफ” चित्रपटामध्ये प्रियांका चोप्रा, कार्ल अर्बन, इस्माइल क्रूझ कॉर्डोवा, सफिया ओकली-ग्रीन आणि टेमुएरा मॉरिसन यांच्या प्रमुख भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. फ्रँक ई. फ्लॉवर्स दिग्दर्शित या चित्रपटात भरपूर अ‍ॅक्शन आहे आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रियांका चोप्राचा हा पहिला हॉलिवूड प्रोजेक्ट नाही; अभिनेत्रीने यापूर्वी “बेवॉच”, “द मॅट्रिक्स रिझरेक्शन्स” आणि “लव्ह अगेन” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने “सिटाडेल” सारख्या वेब सिरीजमध्येही काम केले आहे. त्यामुळे आता या चित्रपटामधील तिचे धाडसी काम पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Priyanka chopra shared first look from the bluff movie actress latest photos viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Priyanka chopra

संबंधित बातम्या

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान
1

सारा अर्जुनने प्रभास आणि विजय सारख्या सुपरस्टार्सला टाकले मागे, ‘धुरंधर’ अभिनेत्रीचे IMDb यादीत अव्वल स्थान

Bhooth Bangla: ५ महिन्यानंतर उघडणार भूत बंगल्याचा दरवाजा, अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र करणार कल्ला
2

Bhooth Bangla: ५ महिन्यानंतर उघडणार भूत बंगल्याचा दरवाजा, अक्षय कुमार–प्रियदर्शन पुन्हा एकत्र करणार कल्ला

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे
3

Box Office Collection: अखेर ‘धुरंधर’ ने मोडला KGF 2 चा रेकॉर्ड, 33 व्या दिवशी ‘पुष्पा 2’ आणि RRR ला देखील टाकले मागे

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित
4

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.