Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ देश भलताच गरीब; पण राजा जगतो ‘लक्झरी लाईफ’, १५ राण्या आणि ३५ मुलांचे कुटुंब

जगभरात राजेशाही जपणारा स्वाझिलँड (Swaziland) हा एकमेव देश राहिला आहे. नुकतंच इथला राजा मस्वति तृतीय (King Maswati III) याने या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनी (Kingdom Iswatini) ठेवलं आहे. या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत. त्यापैकी एका राणीचं निधन झालंय. राजाची पत्नी गर्भवती झाली (the king's wife becomes pregnant) की तिला देशाच्या राणीचा दर्जा दिला जातो.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 27, 2021 | 05:48 PM
‘हा’ देश भलताच गरीब; पण राजा जगतो ‘लक्झरी लाईफ’, १५ राण्या आणि ३५ मुलांचे कुटुंब
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai).  जगभरात राजेशाही जपणारा स्वाझिलँड (Swaziland) हा एकमेव देश राहिला आहे. नुकतंच इथला राजा मस्वति तृतीय (King Maswati III) याने या देशाचं नाव बदलून किंगडम ईस्वातिनी (Kingdom Iswatini) ठेवलं आहे. या 53 वर्षांच्या राजाला तब्बल 15 राण्या आणि अनेक दासी आहेत. त्यापैकी एका राणीचं निधन झालंय. राजाची पत्नी गर्भवती झाली (the king’s wife becomes pregnant) की तिला देशाच्या राणीचा दर्जा दिला जातो. अन्यथा त्या केवळ दासी (a maid) म्हणून राबविले जाते.

[read_also content=”नागपूर/ टोसिलीझुमॅब इंजेक्शनचा काळाबाजार, पोलिसांकडून दोन डॉक्टरांसह तिघांना अटक https://www.navarashtra.com/latest-news/tosilizumab-injection-black-market-police-arrest-three-including-two-doctors-nrat-134555.html”]

स्वाझिलँड आफ्रिका खंडात दक्षिण आफ्रिकेला लागून आहे. या राजाचं शिक्षण विदेशात झालंय. स्वाझिलँड हा गरीब देश असला तरी इथला राजा हा त्याच्या लग्झरी लाईफ(Luxury life)आणि मौज मजेसाठी मनसोक्त पैसे खर्च करण्यासाठी चर्चेत असतो. या राजाला जर एखादी महिला आवडली तर तो तिला त्याच्या गावी म्हणजे रॉयल व्हिलेजमध्ये आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो,असं म्हटलं जातं. स्वाझिलँडचा राजा मस्वति तृतीयला 35 मुलं आहेत. त्याची प्रत्येक राणी संपूर्ण ऐशो आरामात आलिशान बंगल्यात किंवा राजवाड्यात राहते. त्यांच्या लक्झरी आयुष्यावर खर्च करण्यासाठी देशाच्या बजेटमध्ये मोठी रक्कम घोषित केली जाते.

या राजावर एका मुलीला शाळेतून उचलून आणून तिच्याशीलग्नकेल्याचा आरोप आहे. याबद्दलची तक्रार अमनेस्टी इंटरनॅशनल मध्येही (Amnesty International) करण्यात आली होती. घडलेली घटना अशी की, एक 18 वर्षीय शाळकरी मुलगी ऑक्टोबर 2002 मध्ये बेपत्ता झाली होती. तिचं नाव जेना महालांगू होतं. तिच्या आईने याबाबतची तक्रार पोलिसांमध्ये दिली होती. तपासाअंती पोलिसांनी सांगितलं की, ती मुलगी रॉयल व्हिलेजमध्ये असून तिला राजाची पत्नी बनवण्याची तयारी सुरू आहे. मात्र त्या मुलीच्या आईने मुलीला परत पाठवण्याचा हट्ट धरला आणि तक्रार दाखल केली. मात्र, निकाल राजाच्या बाजूने देण्यात आला. कारण हा निकाल सुनावण्यात आला तोपर्यंत ती मुलगी दोन मुलांची आई झाली होती. 2010 मध्ये तिला राणीचा दर्जा दिला गेला. या प्रकरणाची तक्रार अमनेस्टीमध्ये करण्यात आली आणि अमनेस्टीने म्हटलं की राजा आणि त्याच्या लोकांनी महिला आणि मुलींच्या मानवी हक्कांचे उल्लंघन केले आहे.

या देशात सप्टेंबर महिन्याच्या सुमारास राजा देशातील सर्व कुमारी मुलींची परेड आयोजित करतो. यात मुलींना टॉपलेस ठेवले जाते. यापैकी जी मुलगी राजाला आवडेल तिला तो सोबत नेतो. मात्र, याबाबतदेशात बरीच टीका सुरू झाली आहे. राजाच्या 15 बायका सोडून बऱ्याच दासी असल्याचंही म्हटलं जातं.

मागील वर्षी देशातील अनेक युवतींनी या परेडला विरोध दर्शविला. बर्‍याच मुलींनी या परेडमध्ये भाग घेण्यास नकार दिला. मात्र याबाबत राजाला कळताच या मुलींच्या कुटुंबीयांना दंड भरावा लागला. दरम्यान, दरवर्षी राजा आपल्या दोन पत्नींना नॅशनल काऊंसिलर (National Counsellor) बनवून संसदेत सहभागी करतो. मात्र, याची प्रक्रिया क्लिष्ट आहे. या देशाचा राजा स्वतःमोठ्या अभिमानाने आणि ऐशोआरामात जगतो. मात्र देशातील मोठी लोकसंख्या अतिशय गरीब (poor) आहे, असा आरोप येथील लोक राजावर करतात. येथे 63 टक्के लोकसंख्येचं रोजचं उत्पन्न 100 रुपये आहे. मात्र, कितीही टीका केली तरी राजावर फारसा परिणाम होत नाही. आणि हो एक महत्वाचं म्हणजे, या राजाच्या वडिलांनाही 125 राण्या होत्या.

Web Title: This country is rather poor but raja lives a luxury life a family of 15 queens and 35 children nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2021 | 05:40 PM

Topics:  

  • Africa Continent

संबंधित बातम्या

मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’
1

मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’

पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके, अनोखा खुलासा आला समोर
2

पृथ्वी बदलतेय तीच रूप! इथिओपियामध्ये शास्त्रज्ञांना जमिनीखाली ऐकू आले ‘हृदयाचे ठोके, अनोखा खुलासा आला समोर

4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग कसा होता? थरथरणाऱ्या पृथ्वीने उघड केली गूढ रहस्ये
3

4.5 अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीचा पृष्ठभाग कसा होता? थरथरणाऱ्या पृथ्वीने उघड केली गूढ रहस्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.