
दिमाखात पर्यटन करा आणि स्मार्ट शॉपिंग करा! (Photo Credit - AI)
सुट्ट्या आणि खरेदीचा अनुभव अधिक फायदेशीर
एसबीआय कार्ड (SBI Card) या भारतातील अग्रगण्य क्रेडिट कार्ड प्रदात्यातर्फे प्रवास आणि लाइफस्टाइलशी संबंधित अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या सुट्ट्या आणि खरेदीचा अनुभव अधिक फायदेशीर ठरतो. एअर माइल्स, एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस, कॅशबॅक किंवा लोकप्रिय ब्रँड्सवरील रिवॉर्ड पॉइंट्स असोत, डाइनिंगवरील विशेष ऑफर्स किंवा इंधनावरील बचत असो, या क्रेडिट कार्ड्समध्ये सोय आणि मूल्य यांची सांगड घालण्यात आली आहे. येत्या सुट्टीच्या हंगामामध्ये तुम्हाला अधिक बचत करण्यास मदत करणारे काही आघाडीचे क्रेडिट कार्डचे पर्याय खालीलप्रमाणे आहेत.
एसबीआय कार्ड माइल्स एलिट (SBI Card Miles Elite)
लक्झरी आणि सोय हे दोन्ही घटक हवे असलेल्या प्रवाशांसाठी एसबीआय कार्ड माइल्स एलिट हा एक प्रीमियम ट्रॅव्हल साथीदार आहे, जो तुमच्या प्रवासाला खास करतो. या क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क ₹4,999 इतके असून हे कार्ड घेतल्यावर वेलकम गिफ्ट म्हणून 5,000 क्रेडिट्स मिळतात. फ्लाइट्स, हॉटेल्स आणि इतर बुकिंगसाठी या क्रेडिट्सचा वापर करता येतो. यासोबत प्रायोरिटी पास मेंबरशिप, देशांतर्गत 8 एअरपोर्ट लाउंजमध्ये आणि 6 आंतरराष्ट्रीय लाउंज मध्ये मोफत व्हिजिट्स, तसेच फक्त 1.99% इतका कमी फॉरेक्स मार्कअप दर मिळतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक किफायतशीर ठरतो. या शिवाय 1% फ्युएल सरचार्जची सूट मिळाल्यामुळे दैनंदिन खर्चात बचत होते. हे कार्ड आणखी दोन प्रकारांत उपलब्ध आहे — एसबीआय कार्ड माइल्स प्राइम (₹2,999) आणि एसबीआय कार्ड माइल्स (₹1,499).
इंडिगो एसबीआय कार्ड एलिट (Indigo SBI Card Elite)
इंडिगो एसबीआय कार्ड एलिटमुळे तुमचा प्रवासाचा अनुभव आणखी समृद्ध होतो आणि प्रीमियम रिवॉर्ड्स तसेच खास सुविधा मिळतात. या कार्डचे जॉइनिंग आणि वार्षिक शुल्क ₹4,999 (कर अतिरिक्त) आहे. यामध्ये आकर्षक ट्रॅव्हल रिवॉर्ड्स आणि अनेक विशेष लाभ मिळतात. प्रवासाच्या सुविधांमध्ये वर्षाला 8 देशांतर्गत विमानतळ लाउंज व्हिजिट्स (प्रत्येक तिमाहीत 2) आणि 6 आंतरराष्ट्रीय लाउंज व्हिजिट्स (प्रत्येक तिमाहीत 2) मोफत मिळतात. याशिवाय, भारतातील पेट्रोल पंपांवर ₹500 ते ₹4,000 या दरम्यानच्या व्यवहारांमध्ये 1% फ्युएल सरचार्जची सूट लागू आहे. कमी वार्षिक शुल्कात अशाच प्रकारच्या फायद्यांसाठी इंडिगो एसबीआय कार्डचा बेस व्हेरियंट ₹1,499 (कर अतिरिक्त) या दरात उपलब्ध आहे. अधिक रिवॉर्ड्स आणि लाउंज ॲक्सेस हवे असलेल्या वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी इंडिगो एसबीआय कार्ड एलिट हा एक आदर्श पर्याय ठरतो.
क्रिसफ्लायर एसबीआय कार्ड एपेक्स (KrisFlyer SBI Card Apex)
जगभर प्रवास करणाऱ्या आणि सिंगापूर एअरलाईन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिझाइन केलेल्या क्रिसफ्लायर एसबीआय कार्ड एपेक्समुळे प्रीमियम सुविधांचे जग खुले होते. ₹9,999 (कर अतिरिक्त) इतके वार्षिक शुल्क भरून हे कार्ड घेतल्यावर आणि पहिला व्यवहार 60 दिवसांत पूर्ण केल्यावर तुम्हाला 10,000 क्रिसफ्लायर माइल्स वेलकम गिफ्ट म्हणून मिळतात. प्रत्येक तिमाहीत 2 देशांतर्गत आणि 2 आंतरराष्ट्रीय लाउंज भेटींसह $99 किमतीची प्रायोरिटी पास मेंबरशिपही मिळते (ही सुविधा फक्त प्रायमरी कार्डहोल्डरला लागू असून 2 वर्षे वैध असते). या व्यतिरिक्त, भारतभरातील सर्व पेट्रोल पंपांवर ₹500 ते ₹4,000 या दरम्यानच्या व्यवहारांवर 1% फ्युएल सरचार्जची सूट मिळते, ज्यामुळे तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर, फायदेशीर आणि प्रीमियम ठरतो. याच कार्डचा हलका प्रकार क्रिसफ्लायर एसबीआय कार्ड ₹2,999 (कर अतिरिक्त) जॉइनिंग फीवर उपलब्ध असून यातही अनेक ट्रॅव्हल फायदे मिळतात.
बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन (BPCL SBI Card Octane)
दैनंदिन प्रवास करणाऱ्यांसाठी तयार केलेले बीपीसीएल एसबीआय कार्ड ऑक्टेन हे इंधन खरेदीवर जास्तीत जास्त बचत देणारे कार्ड आहे. या कार्डद्वारे इंधन खरेदीवर 7.25% व्हॅल्यू बॅक, 6.25%च्या समतुल्य वाढीव रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात, ज्यामुळे प्रत्येक प्रवास अधिक फायदेशीर ठरतो. या कार्डचे वार्षिक नूतनीकरण शुल्क ₹1,499 (कर अतिरिक्त) असून वार्षिक खर्च ₹2 लाखांपेक्षा जास्त झाल्यास हे शुल्क माफ करण्यात येते.
कॅशबॅक एसबीआय कार्ड (Cashback SBI Card)
प्रत्येक खरेदीवर कॅशबॅक आणि रिवॉर्ड पॉइंट्स हवे असलेल्या ग्राहकांसाठी तयार केलेले कॅशबॅक एसबीआय कार्ड ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारच्या व्यवहारांवर आकर्षक लाभ देते. ऑनलाइन खरेदीवर 5% कॅशबॅक* आणि ऑफलाइन खरेदीवर 1% कॅशबॅक* मिळतो, आणि यासाठी व्यापारी कॅटेगरीवर कोणतीही मर्यादा नाही. कार्डधारकांना ₹500 ते ₹3,000 या दरम्यानच्या व्यवहारांवरील 1% फ्युएल सरचार्जची सूटही मिळते. या कार्डची जॉइनिंग फी ₹999 (कर अतिरिक्त) असून दुसऱ्या वर्षापासून वार्षिक नूतनीकरण शुल्क ₹999 लागू होते. मात्र वार्षिक खर्च ₹2,00,000 पेक्षा जास्त झाल्यास हे शुल्क माफ होते. त्यामुळे रिवॉर्ड्सपेक्षा कॅशबॅकचे थेट फायदे पसंत करणाऱ्यांसाठी हे कार्ड एक स्मार्ट पर्याय आहे. (*सूचना : कार्डधारकाच्या अटी व शर्ती लागू)
टाटा न्यू इन्फिनिटी एसबीआय कार्ड (Tata Neu Infinity SBI Card)
टाटा ब्रँड्समधून वारंवार खरेदी करणाऱ्यांसाठी टाटा न्यू इन्फिनिटी एसबीआय कार्ड प्रत्येक खरेदी अधिक फायदेशीर बनवते. ₹1,499 वार्षिक शुल्क भरून हे कार्ड घेतल्यावर वेलकम गिफ्ट म्हणून 1,499 न्यूकॉईन्स मिळतात (1 न्यूकॉईन = ₹1ची बचत). टाटा न्यू ॲपवरील खर्चांवर 5% न्यूकॉईन्स, निवडक श्रेणींवर अतिरिक्त 5% आणि इतर खर्चांवर (यूपीआय पेमेंट्ससह) 1.5% न्यूकॉईन्स मिळतात. या कार्डमध्ये प्रायॉरिटी पास मेंबरशिप, 8 देशांतर्गत आणि 4 आंतरराष्ट्रीय लाउंजचा ॲक्सेस तसेच 1% फ्युएल सरचार्जची सूट मिळते. वार्षिक खर्च ₹3 लाखांपेक्षा जास्त झाल्यास नूतनीकरण शुल्क माफ करण्यात येते. कमी शुल्कात अशाच सुविधांसाठी टाटा न्यू प्लस एसबीआय कार्ड ₹499 मध्ये उपलब्ध आहे, ज्यावर टाटा न्यू ॲपवरील खर्चांवर 2% न्यूकॉईन्स मिळतात.
फ्लिपकार्ट एसबीआय कार्ड (Flipkart SBI Card)
ऑनलाइन खरेदीची हौस असलेल्या ग्राहकांसाठी फ्लिपकार्ट एसबीआय कार्डामुळे इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, ट्रॅव्हल आणि इतर खरेदींच्या विविध श्रेणींमध्ये कॅशबॅकच्या माध्यमातून सर्वोत्तम मूल्य मिळते. ₹500च्या जॉइनिंग फीवर हे कार्ड घेतल्यानंतर फ्लिपकार्ट ॲपमधून ॲप्लिकेशन केल्यानंतर ₹1,250 मूल्याचे वेलकम बेनिफिट्स मिळतात. या कार्डवर मिंत्रावरील खरेदीवर 7.5% कॅशबॅक, फ्लिपकार्टवर 5% कॅशबॅक, क्लिअरट्रिपवर 12% सवलत आणि झोमॅटो, उबर, नेटमेड्स व पीव्हीआरसारख्या भागीदारांकडून 4% कॅशबॅक मिळते. कॅशबॅक दर महिन्याला आपोआप एसबीआय कार्ड खात्यात जमा करण्यात येते. याशिवाय, प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये ₹400 पर्यंत 1% फ्युएल सरचार्जची सूटही मिळते. फ्लिपकार्ट, मिंत्रा आणि क्लिअरट्रिपच्या ग्राहकांसाठी हे कार्ड परवडणारे आणि जास्तीत जास्त मूल्य देणारे ठरते.
स्मार्ट पद्धतीने खर्च करा आणि अधिक स्मार्ट पद्धतीने आनंद साजरा करा
तुम्ही विमानाचे तिकीट बुक करत असाल, खरेदी करत असाल किंवा अचानक ठरलेल्या सहलीचे नियोजन करत असाल, तुमच्या प्रत्येक गरजेनुसार तयार केलेले एक एसबीआय कार्ड उपलब्ध आहे. हाय-एंड ट्रॅव्हल फायदे, विशेष रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅक सुविधा मिळाल्यामुळे या कार्ड्समुळे तुमचा सुट्टीचा काळ फक्त आनंदी होतोच, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्याही तुमचा भार कमी करणारा ठरतो. त्यामुळे या वर्षी खर्च अधिक स्मार्टपणे करा, अधिक दूरचा प्रवास करा आणि अधिक आनंददायी खरेदी करा. कारण प्रत्येक खर्चातून लाभही मिळू लागला की, सुट्टयांच्या आनंद द्विगुणित होतो.