Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा

भारतामधील डेस्टिनेशन वेडिंग्स स्वप्नवत अनुभव देतात. उदयपूरची राजेशाही, गोव्याचे बीच, केरळची हिरवाई आणि हिमालयातील शांत हिल-स्टेशन्स तुमच्या खास दिवसाला अविस्मरणीय बनवतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 21, 2025 | 08:22 AM
Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा

Destination Wedding साठी भारतातील ही 5 ठिकाणे आहेत ड्रीम लोकेशन, इथे लग्न कराल तर आयुष्यभर लक्षात ठेवाल सोहळा

Follow Us
Close
Follow Us:
  • विवाहासाठी भारतातील उत्तम ठिकाणे
  • नैसर्गिक सौंदर्य आणि संस्कृतीने नटलेली आहे ही जागा
  • हे ठिकाण लग्नाला बनवतील अविस्मरणीय
प्रत्येक जण आपल्या लग्नाला फक्त एक सोहळा न बनवता, आयुष्यभर लक्षात राहील असा अविस्मरणीय अनुभव बनवण्याची इच्छा ठेवतो. आजकाल डेस्टिनेशन वेडिंग हा केवळ एक ट्रेंड राहिलेला नाही, तर कुटुंब आणि मित्रांसोबत एखाद्या सुंदर ठिकाणी एकत्र येऊन खास क्षण साजरे करण्याची एक अनोखी संधी बनली आहे. भारत विविधतेने नटलेला देश असल्यामुळे इथल्या अनेक ठिकाणी तुमचे लग्न स्वप्नवत होऊ शकते. चला तर मग अशाच काही खास ठिकाणांविषयी जाणून घेऊया.

महाराष्ट्राच्या या हिल स्टेशनला ‘इटली’ म्हटले जाते, पण का? सुंदरता पाहून पर्यटक होतात आकर्षित

उदयपूर, राजस्थान

‘लेक सिटी’ उदयपूर हे राजेशाही लग्नासाठी सर्वात परिपूर्ण ठिकाण मानले जाते. भव्य महाल, शांत तलाव आणि समृद्ध सांस्कृतिक वातावरण हे येथे लग्नाला राजवाड्यासारखा अंदाज देते. शहरातील लक्झरी पॅलेस आणि हेरिटेज हॉटेल्स तुमच्या लग्नाला रॉयल टच देतात.

गोवा

बीच वेडिंगची स्वप्ने पाहणाऱ्या जोडप्यांसाठी गोवा म्हणजे स्वर्गच. येथील सुंदर समुद्रकिनारे, रिसॉर्ट्स आणि उत्साही वातावरणामुळे लग्न अत्यंत रंगतदार होते. समुद्राच्या लाटांच्या आवाजात आणि सूर्यास्ताच्या साक्षीने घेतलेले फेरे आयुष्यभर स्मरणात राहतात.

जयपूर, राजस्थान

जर तुम्हाला भव्य आणि शाही अंदाजात लग्न करायचे असेल, तर जयपूर हा सर्वोत्तम पर्याय आहे. किल्ले, पॅलेसेस आणि पारंपरिक राजस्थानी सजावट यांच्या सहकार्याने तुमचे लग्न जणू एखाद्या ऐतिहासिक कथेसारखे वाटते.

केरळ

‘गॉड्स ओन कंट्री’ म्हणून ओळखले जाणारे केरळ हे शांत निसर्ग, बॅकवॉटर आणि दाट हिरवाईसाठी प्रसिद्ध आहे. हाउसबोटवर लग्न किंवा पारंपरिक मलयाळी सजावटीसह केलेला सोहळा हा खरोखरच अनोखा आणि रोमँटिक अनुभव ठरतो.

मसूरी किंवा शिमला

हिमालयाच्या कुशीत वसलेल्या या दोन हिल-स्टेशन्सवर डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे जणू काही परीकथेतले लग्न. पर्वतांची थंड हवा, देवदारांची झाडी आणि बर्फाच्छादित दृश्ये हे क्षण अधिकच खास बनवतात.

वर्षअखेरची Best Trip! ‘पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड…’; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले ‘हे’ खास पॅकेज

अंदमान-निकोबार बेटं

शांत समुद्र, निळेशार पाणी आणि आनंददायी वातावरण—हे सर्व मिळून हे बेट लग्नासाठी अत्यंत खास पर्याय ठरतात. खाजगी बीच वेडिंग किंवा सनसेटच्या प्रकाशात घेतलेले फेरे हा अतिशय वेगळा अनुभव असतो.

आग्रा

प्रेमाचे शाश्वत प्रतीक असलेल्या ताजमहालाच्या सानिध्यात लग्न करणे ही स्वतःमध्येच मोठी गोष्ट आहे. या ऐतिहासिक ठिकाणाचे रोमँटिक वातावरण तुमच्या खास दिवशी अतिरिक्त जादूची भर घालते.

Web Title: These 5 places in india are best for dream wedding travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 08:22 AM

Topics:  

  • lifestyle tips
  • travel news
  • Wedding Season

संबंधित बातम्या

बहुतेक औषधांची चव ही नेहमी कडूच का असते? 99% लोकांना ठाऊक नाही यामागचं खरं कारण… आजच माहिती करून घ्या
1

बहुतेक औषधांची चव ही नेहमी कडूच का असते? 99% लोकांना ठाऊक नाही यामागचं खरं कारण… आजच माहिती करून घ्या

हळदीचा लुक करा अधिक स्टायलिश आणि मॉडर्न, Event ला सर्वांच्या नजरा खिळून राहतील तुमच्यावर
2

हळदीचा लुक करा अधिक स्टायलिश आणि मॉडर्न, Event ला सर्वांच्या नजरा खिळून राहतील तुमच्यावर

40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा
3

40 वयानंतरही तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी या गोष्टींचे सेवन सुरु करा

वर्षअखेरची Best Trip! ‘पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड…’; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले ‘हे’ खास पॅकेज
4

वर्षअखेरची Best Trip! ‘पोर्ट ब्लेअर, हॅवलॉक, नील आयलंड…’; IRCTC ने पर्यटकांसाठी जाहीर केले ‘हे’ खास पॅकेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.