
China bans Japanese seafood which could benefit Indian exporters
China Japan seafood Ban : चीन-जपानमधील तणाव (China-Japan Tensions) पुन्हा एकदा व्यापाराच्या मैदानात पोहोचला आहे. तैवान(Taiwan) प्रश्न, राजनैतिक मतभेद आणि फुकुशिमा अणुजलप्रवाह यामुळे आधीच तापलेल्या संबंधांमध्ये चीनने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. चीनने जपानमधून येणाऱ्या सर्व प्रकारच्या सीफूडवर ( Seafood) संपूर्ण बंदी लागू केली आहे. या निर्णयाने जपानी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला असला, तरी भारतीय सीफूड निर्यातदारांसाठी ही परिस्थिती सोन्याची संधी ठरू शकते.
जपानची एकूण निर्यात पाहिली तर सीफूडचा वाटा फक्त 1% असल्याचे दिसते. मात्र, आश्चर्य म्हणजे या छोट्या वाट्यातही चीनचा हिस्सा तब्बल 20-25% आहे. म्हणजेच, जपानी सीफूडचा सर्वात मोठा खरेदीदार चीनच होता. त्यामुळे चीनने जाहीर केलेली ही बंदी जपानसाठी मोठा झटका ठरला आहे. चीन याआधीही फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पातील उपचारित पाण्याच्या समुद्रात सोडण्यावरून जपानवर नाराज होता. त्यावेळीही काही कालावधीसाठी सीफूड आयात रोखण्यात आली होती. जपानने व्यापार पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले, पण आता चीनचा निर्णय अधिक कडक आणि सर्वंकष आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Climate Summit 2025 : COP30 ब्लू झोनमध्ये भीषण आग;UN प्रमुख आणि भारतीय नेते थोडक्यात बचावले
जपानवरील बंदीनंतर चीनला सीफूडसाठी पर्यायी पुरवठादारांची गरज निर्माण झाली आहे. आणि याच ठिकाणी भारताची एंट्री होते. भारत आधीपासूनच चीनसह व्हिएतनाम, थायलंड, कोरिया आणि इतर आशियाई देशांना मोठ्या प्रमाणात सीफूड निर्यात करतो. गेल्या आर्थिक वर्षात भारताची एकूण सीफूड निर्यात $7.4 अब्ज इतकी होती, त्यात कोळंबी आणि मासे यांचा वाटा 40% पेक्षा जास्त आहे. आता चीनच्या नव्या मागणीमुळे भारतीय निर्यातदारांना मोठी नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे.
China will again ban all imports of Japanese seafood as a diplomatic dispute between the two countries escalates, Japanese media report https://t.co/pbEf6LIFWh pic.twitter.com/OPEWrk9Xwq — Al Jazeera English (@AJEnglish) November 19, 2025
credit : social media
अमेरिका ही भारताची सर्वात मोठी सीफूड बाजारपेठ आहे. परंतु अलीकडेच अमेरिकेने भारतावर मोठे आयात शुल्क लादले. याचे कारण म्हणून भारताने रशियाकडून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल खरेदी केल्याचा मुद्दा मांडला गेला. या अतिरिक्त शुल्कांमुळे भारतीय कोळंबी आणि मासे अमेरिकन बाजारात महाग पडू लागले आणि भारतीय निर्यात तब्बल 9% ने घटली. परंतु आता चीनने जपानवर बंदी घातल्यामुळे अमेरिकेच्या बाजारातील मंदावलेली मागणी भरून काढण्याचा मार्ग भारताला मिळू शकतो. म्हणजे अमेरिकेतील तणाव संपण्याआधीच चीनकडून भारताला मोठा दिलासा मिळू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Tariffs: ‘अमेरिका भारतावर लादणार होती 350% कर…’, अघटित घडण्यापासून थांबवले; Donald Trumpचा खुलासा
केंद्र सरकारने निर्यात-प्रधान उद्योगांना बळ देण्यासाठी अलीकडेच ₹4.5 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. यात कापड, दागिने आणि सीफूड उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. कोळंबी उत्पादकांसाठी विशेष प्रोत्साहन दिले जात असल्याने भारतीय निर्यातदार आता जागतिक मागणी पूर्ण करण्यास अधिक सक्षम आहेत. चीनच्या नव्या धोरणानंतर भारतातील अनेक निर्यात कंपन्या उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहेत. प्रीमियम दर्जाच्या कोळंबी, टायगर प्रॉन, क्रॅब आणि सॅल्मन यांच्या मागणीत मोठी उडी दिसू शकते.
चीनच्या निर्णयामुळे एकीकडे जपानला आर्थिक फटका बसला आहे, तर दुसरीकडे भारतासाठी सलग दोन वर्षे मंदावलेल्या सीफूड निर्यातीला नवीन बूस्ट मिळण्याची संधी निर्माण झाली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची ही वेळ भारतासाठी ‘गेमचेंजर’ ठरू शकते. भारतीय उत्पादकांची क्षमता, सरकारचे प्रोत्साहन आणि जागतिक मागणी यामुळे आगामी काही महिन्यांत निर्यातीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.
Ans: फुकुशिमा अणुजलप्रवाह आणि राजकीय तणावामुळे चीनने जपानी सीफूड आयात रोखली.
Ans: चीनला पर्यायी पुरवठादारांची गरज आहे, आणि भारत प्रीमियम दर्जाचे सीफूड मोठ्या प्रमाणात पुरवू शकतो.
Ans: भारतीय सीफूड अधिक महाग झाल्याने निर्यात सुमारे 9% ने घटली होती.