अकोला (Akola). जिल्ह्यात मान्सूमच्या पावसाने (The monsoon rains in the district) नागरिकांमध्ये हाहाकार माजविला आहे. अकोल्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत (raining heavily in Akola) आहे. यामुळे न्यू तापडिया नगर, क्रांती चौक परिसरातील (New Tapdia Nagar, Kranti Chowk area) नाल्यांना पूर आला आहे. नाल्याचा काही भाग वाहून गेला. न्यू तापडियानगर येथील क्रांती चौक परिसरातील पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढल्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी रेक्यू Operation राबविले होते.
[read_also content=”नागपूर/ म्युकर मायकोसिसमुळे डोळा आणि जबडा निकामी; उपचाराचा खर्च आला दीड कोटी https://www.navarashtra.com/latest-news/eye-and-jaw-failure-due-to-mucormycosis-the-cost-of-treatment-was-rs-1-crore-nrat-140065.html”]
अकोला येथे जोरदार पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे नाल्याला पूर आला. पाण्याचा अंदाज आला नसल्याने येथील नागरिक नाल्यावरील पुराचा प्रभाव कमी होईल या आशेने थांबले होते. मात्र पाण्याचा वेग रात्रभर कमी झाला नाही. शेवटी सकाळी या नागरिकांना नगरसेवक आणि माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोर बांधून त्यांना सुखरूप दुसऱ्या ठिकाणी रेस्क्यु करून बाहेर काढले.
नाल्याचा पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने आसपासच्या काही प्लॉटमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सगळा भाग जलमय झाला होता. नाल्यांमध्ये जलकुंभी असल्यामुळे ते पाणी जायला वेळ लागला आणि नाल्याला मोठा पूर आला. यामुळे काही नागरिक रात्री त्याठिकाणी फसले होते. शेवटी त्यांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात आले.