
Asian Games 2026
समोर आलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजता ‘डुजुआन’ चक्रीवादळ टोक्यो जवळील इझू द्वीपसमूहातील हाचिजो बेटापासून अवघ्या १०० किलोमीटर नैऋत्य-पश्चिमेस असलेल्या भागात केंद्रित झाल्याचे दिसून आले. ताशी २५ किलोमीटर वेगाने हे वादळ उत्तरेकडे पुढे सरकत आहे.
Asian Games: पाकड्यांना दाखवला इंगा! टेबल टेनिसमध्ये भारताने उडवला लाज काढणारा धुव्वा
चक्रीवादळाचा वाढता धोका लक्षात घेता हवामान खात्याने आणि स्थानिक प्रशासनाने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. संभाव्य पुराचा धोका आणि भूस्खलनाच्या शक्यतांमुळे लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सागरी वाहतूक आणि विमानसेवेवरही या वादळाचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या सागरी हद्दीत आणि आसपासच्या क्षेत्रात निर्माण झालेले या वर्षातील हे २५ वे चक्रीवादळ आहे. या वादळाची तीव्रता भीषण असल्याने टोक्योसह पूर्व किनारपट्टीवरील अनेक प्रांतांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. हे चक्रीवादळ सोमवार संध्याकाळपासून ते उशिरा रात्रीदरम्यान टोक्योच्या पूर्वेस असलेल्या चिबा प्रीफेक्चरमधील बोसो प्रायद्वीपाच्या अत्यंत जवळून जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Asian games 2026: गड्यांनो लयं भारी! कबड्डीत भारताचा जपानवर ४९-२३ असा दणदणीत विजय