
वडूज : सुमारे पाच वर्षांपूर्वी वडूज ग्रामपंचायतचे (Vaduj Nagar Panchayat) नगरपंचायतमध्ये रूपांतर झाले. नगरपंचायतीच्या तत्कालीन नगरसेवकांनी कसा बसा गाडा ओढत पाच वर्षे पूर्ण केली. आता या नगरपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, एकूण 17 प्रभाग असलेल्या या नगरपंचायतीच्या प्रभागतील उमेदवारांचे प्रवर्ग आरक्षण जाहीर करण्यात आले असून, दुसरी आरक्षण सोडत सोमवारी (दि. 15) पंचायत समितीच्या बचत सभागृहात पार पडली.
यापूर्वी 12 नोव्हेंबर रोजी पहिली आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती. नव्याने सोडण्यात आलेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक आरक्षण सोडत 2021 प्रमाणे वडूज नगरपंचायत आरक्षण
प्रभाग क्र. – १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्र. – २ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. – ३ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. – ४ सर्वसाधारण,
प्रभाग क्र. – ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला),
प्रभाग क्र. – ६ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. – ७ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. – ८ सर्वसाधारण,
प्रभाग क्र. – ९ सर्वसाधारण
प्रभाग क्र. – १० अनुसूचित जाती जमाती (महिला),
प्रभाग क्र. – ११ अनुसुचित जाती
प्रभाग क्र. – १२ सर्वसाधारण,
प्रभाग क्र. – १३ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. – १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग,
प्रभाग क्र. – १५ सर्वसाधारण महिला,
प्रभाग क्र. – १६ सर्वसाधारण,
प्रभाग क्र. – १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग याप्रमाणे जाहीर करण्यात आली असून, एकंदरीत ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं मात्र निश्चित आहे.