मुंबई : ‘माझा होशील ना’ या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळेने त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्बत केलयं. हे दोघही आता लवकरच लग्नगाठ बांधून त्यांच्या प्रेमाची गाठ आणखी घट्ट करणार आहेत. ‘व्हॅलेंनटाईन डे’ च्या निमित्तानं विराजस कडून जाणून घेऊया विराजसने शिवानीला ‘माझी होशील ना’ कसं विचारलं.
शालेय जीवनामध्ये असताना पहिल्यांदा याबद्दल ऐकलं होतं. रोझ डे, व्हॅलेंनटाईन डे असतो असं तेव्हापासून कळायला लागलं.
ज्यावेळी हे कळतं तेव्हा त्या वयामध्ये एकतर मुलींशी बोलायचं धाडस होतं नाही किंवा आपण त्यांच्यासोबत जास्त संपर्कात नसल्यामुळे बोलत नाही. त्यामुळे हे सगळं मोठ्यांसाठी आहे. याच्याशी आपला काडीचाही संबंध नाही असं वाटतं आणि जेव्हा महाविद्यालयीत जगतात आपण प्रवेश करतो तेव्हा ते थोडीफार मोकळीक असल्यामुळे आपल्यालाही ते कळायला लागतं. दोन वाक्य करायचे
नाही…असं कधी वाटलं नाही. आम्ही सगळे मित्र (त्यावेळी) सिंगल होतो. कुणालाही गर्लफ्रेंड नसली तरी आम्ही सगळे मित्र मिळून व्हॅलेंनटाईन डे साजरा करायचो. मग सिनेमा पाहणं असो की, बाहेर फिरायला जाणं. आम्ही तो दिवस नेहमी सेलिब्रेट करत होतो.
साधारण ११ वर्षापूर्वी आम्ही एका नाटकाच्या निमित्ताने भेटलो. तिथे आमची ओळख झाली. त्यानंतर ‘थेटर ऑन एंटरटेनमेंट’ नाटक ग्रुपशी ती जोडली गेली होती. त्यामुळे हळूहळू ओळखीचं रुपातंर मैत्रीतं झालं आणि मग मैत्री प्रेमात कनव्हर्ट झाली.
खरंतर जिथं नातं जुळणार असेलं तिथं कुणाला एकाला पुढाकार घेऊन प्रपोज करावं लागत नाही. प्रेमाची भावना ही दोघांच्याही मनात असणं आवश्यक असतं आणि न बोलताही, न व्यक्त होता आपण खूपकाही बोलून जातो. पण तरीही टेक्निकली मी आधी तिला प्रपोज केलं.
शिवानी आणि मला एकत्र आयुष्य घालवायचं आहे हे आधीच ठरलं होत. त्यामुळे असं काही खूप खास केलं नाही. मी तिला प्रपोज करणं ही फक्त औपचारिकता राहिली होती आणि ती ‘होच म्हणणार’ याची खात्री होती त्यामुळे तिला अंगठी देऊन तिला प्रपोज केलं.
इतक्या वर्षापासून मैत्री असल्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांची पर्सनालिटी चांगल्याने माहित आहे. त्यामुळे मी शांत किंवा शिवानी फार विचार वैगरे करते असं नाही आहे. ज्या ज्या क्षणाला समोरच्याचे जे गुण चांगले वाटतात ते आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. ज्या क्षणाल दोघांपैकी कुणी कमी पडतंय असं जाणवलं की आम्हगी ऐकमेंकान सावरुन घेतो.
हो, यावर्षी मी शिवानीसोबत ‘व्हॅलेंनटाईन डे’ सेलिब्रेट करु शकत नाही आहे. याची खंत तर आहेच पण यावर्षी चित्रपट दिग्दर्शात पाऊल ठेवत असल्यामुळे कामात व्यस्त आहे. त्यामुळे हा आनंद जास्त आहे. त्यामुळे तो एक दिवस जरी सेलिब्रेट होत नसला तरी आम्ही बाकीचे दिवस सेलिब्रेट करू.
कुठतंरी अख्ख जग त्यादिवशी प्रेमाबदद्ल विचार करत असतं. आपल्या बाजूने विचार करणारी आणि तेव्हा आपला बद्दल विचार करणारं कुणीतरी सोबत असलं तर बरंच वाटतं.
आम्हा दोघांनाही ओम शांती ओम चित्रपटातील ‘मैं अगर कहूं’ हे गाणं आवडतं. मी तिला आता माझ्याकडून हेचं गाणं डेडीकेट करणार.