Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक

एकीकडे उकाड्यामुळे हैराण असलेल्या मुंबईकरांना आता पाणी कपातीचे संकट देखील सोसावे लागणार आहे. कारण मुंबईला पाणी पुरवणाऱ्या जलसाठ्यात केवळ 41 दिवस पाणी पुरेल इतकाचा पाणीसाठा शिल्लक आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2024 | 01:41 PM
मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, ४१ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
Follow Us
Close
Follow Us:

ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणी कपातीचा सामना करावं लागणार आहे. कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याच्य पातळीमध्ये घट होत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या एकूण धरण साठ्यात मागील वर्षीच्या तुलनेत ६ टक्के कमी पाणीसाठी शिल्लक आहे. या सातही धरणांमध्ये फक्त 1 लाख 76 हजार 026 दशलक्ष लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी केवळ 41 दिवस पाणी पुरेल इतकाचा पाणीसाठी शिल्लक असल्याचे म्हटले जातं आहे.

पाणीकपातीचे कारण काय?

गेल्या महिन्यापासून काही जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला आहे. या असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली. या उष्णतेचा परिणाम धरणांतील पाणी साठ्यावर सर्वाधिक होत आहे. कारण या पाण्याचे बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्याने घट होते. त्याचा परिणाम ठाणे आणि उपनगरांतील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो.

[read_also content=”‘पोलीस महानालायक असतात…’, पुण्यातील पोर्शे गाडी अपघातावर केतकी चितळेचा हल्लाबोल, पाहा VIDEO https://www.navarashtra.com/movies/pune-porsche-accident-on-marathi-actor-ketaki-chitale-537131.html”]

एकीकडे उष्णतेची लाट आणि वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा निघत आहेत. तर दुसरीकडे ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलावर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाल्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली. यामुळे पाणीकपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण मुंबई महापालिका प्रशासनाकडून अद्याप पाणी कपातीचे कोणतेही संकेत दिले नाहीत. मात्र मुंबईकरांनी पाणी जपून वापरा, असे आवाहन वारंवार केले जात आहे.

मुंबईतील मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, मोडक सागर, भातसा, (मुंबई पाणीकपात) तानसा, विहार आणि तुळशी किंवा 7 धरणांतून दररोज 3950 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. अशावेळी मुंबईकरांची वार्षिक पाण्याची गरज भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. मात्र गेल्या वर्षीच्या पावसामुळे मुंबईकरांसमोर पुन्हा जलसंकट निर्माण झाले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा

अप्पर वैतरणा धरणामध्ये ११,७३० दशलक्ष लिटर, मोडक सागर धरणामध्ये २४,८९५ दशलक्ष लिटर, तानसा धरणामध्ये ४४,४०९ दशलक्ष लिटर, मध्य वैतरणा धरणामध्ये २१,०१२ दशलक्ष लिटर, भातसा धरणामध्ये ६४,२५८ दशलक्ष लिटर, विहार धरणामध्ये ७,१२७ दशलक्ष लिटर आणि तुळशी धरणामध्ये २,५९५ दशलक्ष लिटर पाणीसाठा शिल्लक आहे.

 

Web Title: Water shortage alert two day water cut in mumbai suburbs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2024 | 01:40 PM

Topics:  

  • Mumbai
  • Water supply in mumbai

संबंधित बातम्या

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर
1

Mumbai Water Shortage: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी पाणीपुरवठा बंद; उरणमध्येही होणार कपात, वाचा सविस्तर

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा
2

Mumbai: यंत्रणा असूनही अन्याय! डॉक्टरांना व्यवसायरोध भत्ता न मिळाल्याने नाराजी; आंदोलन करण्याचा इशारा

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट
3

Mumbai: तीन गर्भपाताचा आरोप, 13 वर्षांचं नातं, तरीही आरोपी निर्दोष; न्यायालयाने दिली कारणं स्पष्ट

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश
4

विमानात बेशुद्ध पडली ‘ही’ अभिनेत्री, क्रू ची मदत न मिळाल्याने व्यक्त केला संताप, एअरलाइनचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.