नवी दिल्ली: आतापर्यंत भारत लिथियमसाठी (Lithium) परदेशातून आयातीवर पूर्णपणे अवलंबून होता. काही दिवसांपुर्वी जम्मू-काश्मीरमध्ये लिथियम साठा आढळला होता. आता त्यापाठोपाठ नुकतचं राजस्थानातही (Rajstan) लिथियमचा आढळल्याची माहिती समोर येत आहे. देशात मुबलक प्रमाणात लिथियमचा साठा उपलब्ध झाल्यामुळे इलेक्ट्रिक वाहने तसेच लॅपटॉप आणि मोबाइलसाठी लागणाऱ्या चार्जेबल बॅटरी इत्यादी तयार करण्यास मदत होणार आहे.
[read_also content=”राज्यातील सरकार बेकायदेशीर, उद्धव ठाकरेंचा घणाघात, निवडणुकांना सामोरं जाऊ, सत्ताधाऱ्यांना आवाहन, पत्रकार परिषदेतील 16 महत्त्वाचे मुद्दे https://www.navarashtra.com/maharashtra/uddhav-thackerays-criticized-on-supreme-court-decision-saying-government-in-the-state-is-illegal-important-points-in-the-press-conference-nrps-398089.html”]
लिथियम हा नॉन-फेरस धातू असून तो इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरला जातो. मोबाईल फोन,लॅपटॉप, डिजिटल कॅमेरा किंवा सोलर पॅनेल, इलेक्ट्रिक वाहनांसाठी रिचार्ज करण्यायोग्य बॅटरीमध्ये वापरला जातो. याशिवाय खेळणी आणि घड्याळांसाठीही याचा वापर होतो. आता हा साठा सापडल्यामुळे त्याचा मुबलत प्रमाणात वापर होऊन देशातल्या ईव्ही उद्योगाला मोठं बळ मिळणार.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने धोरणात्मक आणि महत्त्वाच्या खनिजांवर 115 प्रकल्प तयार केले आहेत. त्याचबरोबर खत खनिजांसाठी 16 प्रकल्प तयार करण्यात आले आहेत. रेल्वेला मदत करण्यासाठी कोळशाचे साठे शोधण्यासाठी 1851 मध्ये GSI सुरू करण्यात आले. तथापि, 200 हून अधिक वर्षांच्या प्रवासात, GSI भूविज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. यासोबतच याला जिओ सायंटिफिक ऑर्गनायझेशनचा दर्जाही मिळाला आहे.
सर्वप्रथम, लिथियमबद्दल एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे, कोणत्या देशांमध्ये लिथियमचे सर्वात जास्त साठे आहेत आणि कोणत्या देशात लिथियमचे उत्पादन जास्त आहे. प्रमुख लिथियम उत्पादक देश निश्चितपणे मोठ्या संख्येने लिथियम कंपन्यांचे घर आहेत. जगातील अनेक आघाडीचे लिथियम उत्पादकही मोठा साठा ठेवतात आणि त्यांच्या साठ्यावरून त्या देशांना भविष्यात किती विकास करायचा आहे, याचा अंदाज येऊ शकतो.
21 दशलक्ष टनांसह जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा सध्या बोलिव्हिया देशात आहे. यानंतर अर्जेंटिना, चिली आणि अमेरिकेतही मोठा साठा आहे. चीनकडे केवळ 5.1 दशलक्ष टन लिथियमचा साठा आहे, तरीही जागतिक बाजारपेठेत चीनची मक्तेदारी कायम आहे. यूएसए भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार, जगातील सर्वात मोठे लिथियम साठे खालीलप्रमाणे आहेत.
जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील सलाल-हिमाना प्रदेशात लिथियमचा साठा सापडला आहे. देशात याचे एकूण ५१ ब्लॉक सापडले आहे. यापैकी ५ ब्लॉकमध्ये लिथियम, गोल्ड, पोटॅश, मॉलिब्डेनमचे साठे आहेत. २०१८ ते आतापर्यंत हे ब्लॉक्स शोधण्यात आले आहेत. याशिवाय १७ ब्लॉक्समध्ये कोळशाचा साठा आहे.