Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

Methi Masala Bati Recipe : रोज तेच तेच जेवण कंटाळला असाल तर घरी बनवा खमंग मेथी मसाला बाटी. तुपात बुडवून मग जेव्हा डाळीसोबत तुम्ही ही बाटी चाखाल तेव्हा तोंडातून फक्त व्वा व्हाच निघेल!

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 10, 2026 | 09:48 AM
Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची 'मेथी मसाला बाटी'

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची 'मेथी मसाला बाटी'

Follow Us
Follow Us:
  • बाटी हा पदार्थ मुळतः राजस्थानचा, हा तिथला पारंपारिक पदार्थ आहे.
  • आपण आजवर बाटी हा पदार्थ चाखला असेल पण तुम्ही कधी मेथी मसाला बाटी खाल्ली आहे का?
  • याची चव मनाला शांत आणि तृप्त करून जाते.
डाळ बाटी हा राजस्थानचा पारंपरिक पदार्थ आहे. राजस्थानमध्ये बाटी विविध प्रकारे तयार केली जाते. हिवाळ्यात जेव्हा ताजी हिरवी मेथी बाजारात मुबलक मिळते, तेव्हा तिथे खास मेथी मसाला बाटी बनवली जाते. या बाटींची चव इतकी अप्रतिम असते की एकदा खाल्ल्यावर पुन्हा बनवावीशी वाटते. खमंग भाजलेली बाटी तुपात बुडवून मग फळीसोबत हिची चव घ्या, तुम्ही मंत्रमुग्ध नाही झालात तर सांगा….

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हलवाई स्टाईल ‘दही कचोरी’, चटकदार चव; टी-टाईम स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

घरी पाहुणे आले असतील किंवा काहीतरी वेगळं आणि खास बनवायचं असेल, तर मेथी मसाला बाटी हा उत्तम पर्याय ठरतो. हा पदार्थ फक्त चवीलाच नाही आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायद्याचा ठरतो.चला तर मग, फटाफट जाणून घेऊया मेथी मसाला बाटीची सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी.

साहित्य 

  • गव्हाचे पीठ – 1 कप
  • बेसन – 5 मोठे चमचे
  • ताजी हिरवी मेथी (बारीक चिरलेली) – 5 मोठे चमचे
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे पूड – 1 टीस्पून
  • हळद – 1 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • ओवा – ½ टीस्पून
  • हिंग – चिमूटभर
  • बेकिंग सोडा / मीठा सोडा – ½ टीस्पून
  • आले–लसूण कुटलेले – 1 टीस्पून
  • कोथिंबीर (बारीक चिरलेली) – 2 मोठे चमचे
  • तेल किंवा तूप – 2–3 मोठे चमचे
  • कोमट पाणी
  • देसी तूप
सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

कृती 

  • सर्वप्रथम एका मोठ्या परातीत 1 कप गव्हाचे पीठ घ्या. त्यात 5 मोठे चमचे बेसन आणि 5 मोठे चमचे बारीक चिरलेली मेथी घाला. आता यात 1 टीस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, थोडा ओवा आणि चिमूटभर हिंग मिसळा.
  • अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घालून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कुटलेले आले आणि लसूण घाला. सर्व साहित्य नीट एकजीव करून घ्या.
  • आता मिश्रणात ताजी, बारीक चिरलेली हिरवी मेथी घाला. मोयनासाठी तेल किंवा तूप वापरून सर्व साहित्य चोळून घ्या.
  • नंतर कोमट पाणी घालत थोडं थोडं करून मऊसर पीठ मळून घ्या. या पिठाच्या मध्यम आकाराच्या गोळ्या करून गोल बाटी तयार करा. प्रत्येक बाटीच्या मधोमध हलकं दाब देऊन ठेवा.
  • गॅसवर तंदूर किंवा जाड तवा गरम करा आणि त्यावर बाटी मंद आचेवर भाजून घ्या. बाटी सर्व बाजूंनी छान सोनेरी आणि खमंग होईपर्यंत शेकाव्यात. इच्छेनुसार या बाटी तेलात किंवा तुपात तळूनही घेऊ शकता.
  • तयार झालेल्या गरमागरम बाटी देसी तुपात बुडवून सर्व्ह करा.
  • मेथी मसाला बाटी खूपच खमंग, कुरकुरीत आणि मसालेदार लागते. राजस्थानमध्ये या बाटी सहसा कढी किंवा डाळीसोबत खाल्ल्या जातात. नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण कुठल्याही वेळेस ही डिश छान लागते.

Web Title: How to make methi masala bati at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 09:48 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • rajasthan

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.