Siddharth&Manjrekar (फोटो सौजन्य-Instagram)
मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव या दोघांनी अनेक चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. सिद्धार्थने त्याच्या कारकिर्दीत नुकतेच कॉमेडी चित्रपट न करता कित्येकदा धाडसी अभिनय त्याने त्याच्या भूमिकेत साकारला आहे. सिद्धार्थने महेश मांजरेकरांच्या लालबाग परळ या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली असून, त्याच्या या चित्रपटातील भूमिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या नंतर सिद्धार्थने कुटुंब, दे धक्का, दे धक्का २ यांसारख्या चित्रपटामध्ये महेश मांजरेकरांसोबत काम केले. हे सगळे चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडले असून सिद्धार्थ चा चाहता वर्ग वाढू लागला.
तसेच अनेकदा सिद्धार्थ आणि महेश मांजरेकरांची केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखती दरम्यान वास्तव या हिंदी चित्रपटाचे रिमेक करायचे तुम्ही ठरवले तर कोणता मराठी अभिनेता तुमच्या नजरेत आहे असे विचारल्या वर दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले की, ‘आज मराठी सिनेमासृष्टीत तसे सगळ्याच नट चांगले काम करत आहेत. तरीही माझ्या नजरेत कोण असेल तर तो सिद्धार्थ जाधव आहे, कारण तो फक्त कॉमेडी भूमिका साकारत नाही तर अनेक धाडसी भूमिका साकारण्याचे त्याच्यात बळ आहे. आणि तो खूप उत्तमरीत्या ते काम पार पडतो.” असे त्यांनी सांगतले.
महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, “मी त्याची जेव्हा लालबाग परळ या चित्रपटासाठी निवड केली होती तेव्हा मला अनेक लोक म्हणाले होते की सिद्धू ला या भूमिकेसाठी घेणे रिस्क आहे. तो हे करू शकणार नाही. पण त्या भूमिकेसाठी तोच योग्य आहे याची मला खात्री होती कारण सिद्धार्थ एक वर्सटाईल अभिनेता आहे आणि ती भूमिका त्याने अत्यंत हुशारीने पार पडली. असे दिग्दर्शक मांजरेकरांनी सांगितले.
वास्तव या चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर, हा चित्रपट १९९९ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः महेश मांजरेकर असून, या चित्रपटात संजय दत्त या अभिनेत्याची मुख्यभूमिका पाहायला मिळाली होती. वास्तव: द रिॲलिटी हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटाने त्या काली भरपूर कमाई केली असून, प्रेक्षकांच्या तो प्रचंड पसंतीस आला.