Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रावण कॉलिंग’ हे सिनेमाचं नाव आहे! सिनेमामध्ये नेमकं काय? उत्कंठा शिगेला; पाहा मोशन पिक्चर

येत्या नवीन वर्षात एक थ्रिलर, कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले

  • By अमृता यादव
Updated On: Oct 03, 2025 | 07:49 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

मराठी पडद्यावर लवकरच एका थ्रिलर, कॅामेडी सिनेमाची एंट्री होणार असून येत्या नवीन वर्षात म्हणजेच ९ जानेवारी २०२६ मध्ये ‘रावण कॉलिंग’ हा धमाल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.

पोस्टरमध्ये लालसर पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळांमध्ये जळणारी रावणाची मूर्ती दाखवण्यात आली आहे. धगधगत्या आगीतून उमटणारी ही छबी प्रेक्षकांना एका अनोख्या आणि रोमांचकारी प्रवासाची चाहूल देणारी आहे.

गोल्डन गेट प्रॅाडक्शन निर्मित आणि मुंबई पुणे फिल्म्स एंटरटेनमेंट प्रस्तुत या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक गुणाजी आणि संदीप बंकेश्वर यांनी एकत्रितपणे सांभाळली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा सुपुत्र अभिषेक गुणाजी या चित्रपटातून पहिल्यांदाच दिग्दर्शनाच्या भूमिकेत पदार्पण करत आहे. यात सचित पाटील, वंदना गुप्ते, सोनाली कुलकर्णी, पूजा सावंत, गौरव घाटणेकर, रवी काळे आणि मिलिंद गुणाजी अशी दिग्गज कलाकारांची मोठी फौज झळकणार आहे.

शोएब मलिक आणि सना जावेदच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

दिग्दर्शक अभिषेक गुणाजी म्हणाले, ‘’हा माझा पहिलाच दिग्दर्शनाचा अनुभव आहे. ‘रावण कॉलिंग’ अनेक सरप्राईजेसने आणि ट्विस्ट्स ॲण्ड टर्न्सने भरलेला आहे. जबाबदारी खूप मोठी आहे, परंतु मी शंभर टक्के त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि प्रतिसाद मिळण्याची आतुरता आहे.”

दिग्दर्शक संदीप बंकेश्वर म्हणाले, ‘’ विषय वेगळ्या धाटणीचा असून हा एक धमाल चित्रपट आहे. अशा ताकदीच्या आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करणं हा अविस्मरणीय अनुभव होता. आम्हाला खात्री आहे की, प्रेक्षकांना हा सिनेमा नक्कीच भावेल.”

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

जरी कथानक अद्याप गुप्त ठेवण्यात आले असले तरी, हा एक कॅामेडी, थ्रिलर आणि प्रत्येक वळणावर काहीतरी ट्विस्ट्स घेऊन येणारा चित्रपट आहे. यातील दमदार कलाकारांची एकत्रित कामगिरी प्रेक्षकांना एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देणार हे निश्चित आहे

Web Title: Raavan calling is the name of the movie what exactly is in the movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 07:49 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

शोएब मलिक आणि सना जावेदच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
1

शोएब मलिक आणि सना जावेदच्या नात्यात दुरावा? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया
2

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

Tu He Re Maza Mitwa  : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण
3

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो
4

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड अभिनेत्रीने केली लेकीच्या नावाची घोषणा, पाहा फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.