भारतातील कोणत्या शहरात ठेवले जात आहेत सर्वाधिक विवाहबाह्य संबंध? (फोटो सौजन्य - iStock)
विवाहबाह्य संबंध शोधणाऱ्या व्यक्तींसाठी प्रामुख्याने बाजारपेठ उपलब्ध असलेल्या ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्म अॅशले मॅडिसनने जून २०२५ साठी नवीन वापरकर्ता डेटा जारी केला आहे. ज्यामध्ये लहान शहरे आणि गावांमध्ये विवाहबाह्य संबंधांमध्ये वाढ झाल्यामुळे भारत हा त्याच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले आहे आणि नको त्या बाबतीतदेखील भारतातील एका राज्यामधील शहराने यात क्रमांक पटकावला आहे आणि हे नक्कीच अभिमानस्पद नाही.
काय सांगतो नवा डेटा
ग्लोबल डेटिंग प्लॅटफॉर्मच्या नवीन डेटानुसार, तामिळनाडूमधील कांचीपुरमने दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांना मागे टाकत संपूर्ण भारतात साइनअपचा सर्वाधिक दर नोंदवला. या शहराने साइटवरील विवाहबाह्य संबंधांमध्ये नाट्यमयरित्या वाढ पाहिली आहे. इतकंच नाही तर २०२४ मध्ये हेच शहर विवाहबाह्य संबंधाच्या बाबतीत १७ व्या क्रमांकावर होते.
अॅशले मॅडिसनने शहराच्या जलद वाढीबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, परंतु यादीतील कांचीपुरमचे स्थान टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये अॅपच्या वाढत्या उपस्थितीचे प्रतिबिंब असल्याचे म्हटले आहे. इतकंच नाही तर काही महानगरीय क्षेत्रांनादेखील या शहराने मागे सोडल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
मेट्रो शहरांचा क्रमांक कितवा?
अॅशले मॅडिसन साइनअपने जाहीर केलेल्या टॉप २० भारतीय जिल्ह्यांच्या यादीत दिल्ली-एनसीआर प्रदेशातील नऊ ठिकाणांचा समावेश आहे, ज्यामध्ये दिल्लीचे सहा जिल्हे – मध्य दिल्ली (दुसऱ्या क्रमांकावर), दक्षिण पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली – तसेच गुडगाव, गाझियाबाद आणि गौतम बुद्ध नगर (नोएडा) ही शेजारील शहरे समाविष्ट आहेत.
मुंबई मात्र टॉप 20 मध्ये नाही
याउलट, मुंबईने टॉप २० मध्ये स्थान मिळवले नाही, तर जयपूर, रायगड, कामरूप आणि चंदीगड सारखी शहरे प्रमुख ठिकाणी असल्याचे दिसून आले आहे. यादीनुसार, गाझियाबाद आणि जयपूर ही दोन्ही टियर-२ शहरे आहेत, त्यांनी साइनअप आणि विवाहबाह्य संबंधांच्या बाबतीत अनेक शहरी केंद्रांना मागे टाकले आहे. सदर प्लॅटफॉर्मने म्हटले आहे की रँकिंग केवळ नवीन वापरकर्त्यांच्या साइनअपवरच नव्हे तर संबंधांची तीव्रता आणि प्रतिबद्धता डेटावरदेखील आधारित आहे, जे अनेक जण नात्यात प्रामाणिक आणि एक पत्नीव्रता नसण्याचे ट्रेंड दर्शवितात.
भारतातील फसवणूक वाढते आहे का?
एप्रिलमध्ये, अॅशले मॅडिसनने YouGov च्या सर्वेक्षणाचे निकाल शेअर केले होते ज्यामध्ये असे दिसून आले होते की भारत आणि ब्राझीलमधील प्रौढांमध्ये Extra Marital Affair ची कबुली देण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वेक्षणानुसार, ५३ टक्के भारतीय प्रतिसादकर्त्यांनी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केले.
अॅशले मॅडिसनचे मुख्य धोरण अधिकारी पॉल केबल म्हणाले, “ही आकडेवारी एक उल्लेखनीय ट्रेंड अधोरेखित करते – आधुनिक नातेसंबंधांची नव्याने परिभाषा करण्यात भारत आघाडीवर आहे, सर्वेक्षणात अर्ध्याहून अधिक प्रौढांनी आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे. भारत आमच्या जागतिक बाजारपेठांमध्ये आधीच सहाव्या क्रमांकावर आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की वर्षाच्या अखेरीस हे आणखी वाढेल.” असेही या सर्वेक्षणानंतर पॉल यांनी सांगितले आहे.
जोडीदाराचे आहेत विवाहबाह्य संबंध, कसे ओळखतात महिला, अभ्यासातून आला खुलासा समोर