किस केल्याने खरंच तोंडातून बॅक्टेरिया जातो का?
कोणत्याही नात्यात चुंबन घेणे अर्थात Kiss करणे हे महत्त्वाची भूमिका बजावते. चुंबनापासूनच प्रेमाला सुरुवात होते आणि कोणत्याही जोडीतील शारीरिक संबंधाचा हा महत्त्वाचा भाग आहे. मात्र तुम्हाला माहीत आहे का? १० सेकंदांच्या चुंबनादरम्यान, ८ कोटी बॅक्टेरिया एकमेकांच्या तोंडात जातात. नेदरलँड्सच्या शास्त्रज्ञांच्या पथकाने एका अभ्यासाद्वारे हे सांगितले आहे.
या शास्त्रज्ञांनी २१ जोडप्यांनी घेतलेल्या चुंबनाचे निरीक्षण केले आणि त्यावर अभ्यास केला. या काळात अभ्यासादरम्यान असे आढळून आले की जे लोक दिवसातून नऊ वेळा एकमेकांचे किस घेतात त्यांच्या लाळेद्वारे बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता जास्त असते. हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय (फोटो सौजन्य – iStock)
कपल्सना विचारले प्रश्न
अभ्यासात कसे झाले सिद्ध
नेदरलँड्स ऑर्गनायझेशन फॉर अप्लाइड सायंटिफिक रिसर्च (TNO) च्या एका टीमने जोडप्यांना त्यांच्या चुंबन घेण्याच्या सवयींबद्दल अनेक प्रश्न विचारले. गेल्या वर्षी त्यांनी एकमेकांना किती वेळा चुंबन घेतले आणि शेवटचे ओठ बंद करून कधी चुंबन घेतले हे महत्त्वाचे प्रश्न होते. त्यानंतर शास्त्रज्ञांनी नंतर १० सेकंदांच्या चुंबनानंतर प्रथम या जोडप्यांच्या जिभेचे आणि लाळेचे नमुने घेतले आणि त्या त्यानंतर अभ्यासातून या गोष्टींचा खुलासा केलाय.
8 कोटी बॅक्टेरिया ट्रान्सफर
Kiss घेतल्यानंतर, एका जोडीदाराला एक प्रोबायोटिक पेय पिण्यास देण्यात आले, ज्याच्या मदतीने बॅक्टेरिया सहज ओळखता येतात. दहा सेकंदांच्या चुंबनानंतर, सुमारे 80 दशलक्ष बॅक्टेरिया ट्रान्सफर होतात. हा अभ्यास मायक्रोबायोम जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या पथकाचे प्रमुख प्रोफेसर रेम्को कोर्ट सांगतात की फ्रेंच किसिंगद्वारे बॅक्टेरिया एका तोंडातून दुसऱ्या तोंडात खूप लवकर आणि मोठ्या संख्येने पोहोचतात.
होतील ‘हे’ आजार
चुंबन घेण्याने कोणते आजार होऊ शकतात
पाण्याने मरत नाहीत फळांवर चिकटलेले किडे, पोट आतून सडवतात; मुळापासून घाण उपटून टाकतील 4 पद्धती
हृदयासाठी उत्तम ठरते Kiss
चुंबन घेताना शरीरात अॅड्रेनालिन नावाचा हार्मोन तयार होतो जो हृदयासाठी खूप फायदेशीर असतो. हे हृदयाला संपूर्ण शरीरात रक्त पंप करण्यास मदत करते. यामुळे रक्तदाब कमी होण्यास आणि शरीरात रक्ताभिसरण योग्य राहण्यास मदत होते. याशिवाय, चुंबन तुमचे हृदय तंदुरुस्त ठेवण्यास आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांपासून संरक्षण करण्यास अनेक प्रकारे मदत करते. एका संशोधनानुसार, चुंबन शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळीदेखील नियंत्रित करते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.