कृत्रिम बटाट्यांमुळे होऊ शकतो कॅन्सर
अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या (FSDA) पथकाने बलिया येथे 21 क्विंटल बनावट बटाटे जप्त केले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पांढऱ्या बटाट्यांवर लाल रंग रंगवून जास्त भावात त्याची विक्री करण्यात येत होती. हे बनावट बटाटे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच त्रासदायक ठरू शकतात.
बटाट्याचा वापर प्रत्येक घरात केला जात असून यातून भाज्या, चिप्स, पापड, समोसे आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. नफा वाढवण्यासाठी व्यावसायिक रसायनाने रंगवून चढ्या भावाने विकतात. हा नकली बटाटा आणि हानीकारक रंग आरोग्यासाठी खूप वाईट असू शकतो आणि यामुळे कर्करोग देखील होऊ शकतो हे आता समोर आले आहे. या भाजीच्या सेवनाने तुमच्या शरीरातील पेशींचे नुकसान होते आणि तुम्ही आजारी पडू शकता. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) ने बनावट बटाटे हातात धरताच कसे ओळखावे याची सोपी पद्धत सांगितली आहे, त्याबाबत आपण जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
केमिकलयुक्त बटाट्याचा परिणाम
केमिकल असल्यास बटाट्यावर काय होतो परिणाम
FSSAI च्या म्हणण्यानुसार, फळे आणि भाज्या लवकर शिजवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. या रसायनाला ॲसिटिलीन वायू किंवा मसाला असेही म्हणतात. कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस असते, ज्यामुळे उलट्या, जुलाब, रक्तळलेले शौच, छातीत जळजळ, पोटात जळजळ, जास्त तहान किंवा अशक्तपणा होऊ शकतो. त्यामुळे या रसायनावर बंदी घालण्यात आली आहे.
हेदेखील वाचा – जेवल्यावर त्वरीत वाढतेय Blood Sugar? 30 मिनिट्स आधी करा असे काम की राहील नियंत्रणात
आर्सेनिकमुळे कॅन्सर
आर्सेनिक केमिकलमुळे होऊ शकतो कॅन्सर
कॅल्शियम कार्बाइडमध्ये असलेले आर्सेनिक हे कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरू शकते. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्याप्रमाणे दीर्घकालीन संपर्कामुळे मूत्राशय आणि फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका सर्वाधिक असतो. यामुळे इतर कर्करोगदेखील होऊ शकतात. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (IARC) च्या मते, पिण्याच्या पाण्यात आर्सेनिक असले तरी ते कर्करोगास कारणीभूत ठरू शकते.
रेड डायचा वापर
बटाट्यावर केला जातो रेड 40 चा वापर
मिळालेल्या वृत्तानुसार बटाट्याला लाल रंग दिला जात होता. यासाठी, रेड 40 नावाचा रंग अनेकदा वापरला जातो. काही संशोधनात असे म्हटले आहे की त्याचे कण शरीरात प्रवेश करून मोठी हानी करू शकतात आणि ते कार्सिनोजेनिक मानले जातात. त्यामुळे तुमच्या शरीराला जास्त हानी पोहचू शकते.
हेदेखील वाचा – 38 टक्के भारतीय पॅकेटबंद फूड खाऊन भरतायत पोट, धक्कादायक दुष्परिणाम
कसा ओळखाल बनावट बटाटा?
बनावट बटाट्याची ओळख कशी करावी
FSSAI ने कॅल्शियम कार्बाइडने शिजवलेले पदार्थ कसे ओळखायचे ते स्पष्ट केले आहे. बटाट्याच्या त्वचेवर काळे डाग किंवा असामान्य रंग असल्यास, ते रसायनांनी युक्त असू शकते आणि ते विकत घेऊ नये. कारण कॅल्शियम कार्बाइडमुळे असे डाग तयार होतात. हिरवा रंग किंवा वास येणारे बटाटे देखीलखरेदी करू नयेत.
कसा काढणार कृत्रिम रंग
बटाट्यावरील कृत्रिम रंग कसा काढावा
बटाट्यांवर कृत्रिम रंग लावला असेल तर त्यावरही उपाय आहे. बटाटे खरेदी करताना, बटाटे हाताने मॅश करा, जर हाताला तुमच्या कोणताही रंग राहिला तर ते बनावट असू शकते. याशिवाय बटाटे एका भांड्यात काही वेळ पाण्यात सोडा. हाताने घासून रंग तपासा आणि मगच त्याचा पुढे वापर करावा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.